शेततळे मत्स्यपालन अनुदान योजना Shettale Matsyapalan Anudan Yojana

Shettale Matsyapalan Anudan Yojana मित्रांनो गोड्या पाण्यातील मत्स्य पालन आणि त्याला दिला जाणारा अनुदान याबद्दलची माहिती पाहूया. शेततळे हा शाश्वत सिंचनाचा स्त्रोत आहे. या शेततळ्यात मधून शेतीला पूरक जॉन जोडधंदा म्हणून आपण मत्स्यपालन व्यवसाय करू शकतो. मत्स्यपालन करता 15 जिल्ह्यातील 5142 गावांमध्ये राबविली जाणारी महत्त्वपूर्ण अशी योजना नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना (POCRA) होय. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अर्थसहाय्य केले जाते.

कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कशा प्रकारे अर्थसहाय्य दिल्या जाते, अटी व शर्ती तसेच निकष काय लावले जातात? अनुदान किती मिळणार या योजनेचा अर्ज ऑनलाईन भरायचा का ऑफलाईन.

निवडीचे निकष

ग्राम कृषी संजीवनीने जे काही मान्यता दिलेले अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक शेतकरी आहेत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग शेतकरी आणि इतर सर्वसाधारण शेतकरी अशा प्रकारे अशाप्रकारे प्राधान्यक्रमाने निवड केली जाते शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचनाची सोय आहे ज्यामध्ये सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अशा शेतकऱ्यांना या योजनेमार्फत लाभ मिळतो. याचप्रमाणे मत्स्यशेती अंतर्गत लाभार्थ्याने, या व्यतिरिक्त कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अशा प्रकारे वरील सर्व लाभार्थी निवडीचे निकष आहेत.

त्याचप्रमाणे ज्या शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करायचा आहे त्या पाण्याचा साठा किमान आठ ते दहा महिने असणे आवश्यक आहे मत्स्य पालन करण्यासाठी तलाव हे शक्यतो आयताकृती असावेत त्यामुळे मासे पकडण्यासाठी जाळे फिरवणे सोयीचे जाते तलावाची खोली किमान 1.2 मीटर ते 2 मीटर असणे गरजेचे आहे.

Read  PM Kisan 11th Installment Date in Marathi | पी एम किसान योजना 11वा हप्ता तारीख

मार्गदर्शक सूचना

1) गोळ्या पाण्यात जलद वाढणाऱ्या माशांच्या जाती म्हणजे कटला रोहू मृगळ चंदेरा गवत्या आणि सायप्रिनस किंवा कोळंबी इत्यादी जातींची पैदास करण्यात यावी.

2) मत्स्य पालना साठी तलावातील पाण्याचा आम्लता निर्देशांक 6.5 ते 7.5 या दरम्यान असल्यास मासे चांगले वाढतात यासाठी आवश्यकता असल्यास चुना पाण्यात मिसळावा.

3) तळ्यातील पाण्याचे तापमान 24 ते 30 डिग्रीपर्यंत असावे. जेणेकरून पाण्यातील माशांची वाढ ही जलद गतीने होईल.

4) पाण्याची नैसर्गिक उत्पादकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खत म्हणून ताजे शेण टाकावे त्यानंतर मोनी यम सल्फेट सिंगल सुपर फास्फेट प्रमाणात टाकावे व त्यानंतर बोटुकली सोडावीत कोळंबी उत्पादन न करता 15 दिवस अगोदर एक टन शेणखत दोनशे किलो चुना खत म्हणून टाकावे व यानंतर प्रत्येक महिन्यात पाचशे किलो शेण व 15 किलो चुना मिसळावा.

5) प्लॅस्टिक आच्छादन असलेल्या तलावात खताची मात्रा वापरण्यात येऊ नये प्लॅस्टिक आच्छादन असल्याने नैसर्गिक खाद्य निर्मितीवर परिणाम होतो त्यामुळे माशांच्या वाढीसाठी प्रथिनेयुक्त खाद्य देणे आवश्‍यक आहे.

6) एक जातीय मत्स्यसंवर्धन म्हणजे ज्याला आपण Mono Culture म्हणतो करताना मासे 5000 ते 10000 बोटुकली प्रति हेक्‍टर या प्रमाणात संचयन केले जाते.

7) एकत्रित मत्स्यसंवर्धन त्याला आपण कंपोझिट फिष कल्चर म्हणतो हे करताना दोन किंवा जास्त माशांच्या जातींचे एकत्रित संवर्धन केले जाते यामध्ये रोहू कटला व मृगळ या भारतीय प्रमुख कार्प बरोबरच चिनी कार्प म्हणजेच गवत्या व चंदेरा आणि कॉमन कार्प म्हणजे साय प्रिणस फिश इत्यादी माशांचे संवर्धन करता येते.

Read  Kusum Solar Pump Online Registration | कुसुम सोलर पंप योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन .

8) मासळीच्या जातीनुसार एकूण संख्येपैकी कटला 40% रोहू 30% व मृगळ किंवा सायप्रिनस 30% मत्स्य बोटुकली शेततळ्यात सोडण्यात यावी.

9) मत्स्यबीज यांचे 80 टक्के जीवित प्रमाण गृहीत धरून त्याप्रमाणे बीज खरेदी करावे.

लाभार्थ्यास शासकीय दरानुसार मत्स्यबीज खरेदीसाठी अनुदान देय असेल.

मत्स्य संवर्धन करण्यासाठी शेततळ्याच्या आकारानुसार आवश्यक बोटुकली.

 

खाद्य व्यवस्थापन करताना मार्गदर्शक सूचना

तलावातील नैसर्गिक खाद्य नियमित तयार होण्याकरता ताजे शेन बदकाची किंवा कोंबडीची विस्टा, शेणाची स्लरी टाकतात तसेच थोड्या प्रमाणात युरिया व सुपर फॉस्फेट पाण्यात विरघळून टाकावे लागते.

नैसर्गिक खाद्याबरोबर पूरक खाद्य म्हणून शेंगदाणा ढेप, सोयाबीन ढेप, तांदळाचा कोंडा, गव्हाचा कोंडा, मका, मच्छी कुटी, रेशमी आळ्या व कत्तलखान्यातील जनावरांची कातडी इत्यादी वापरण्यात येते.

भाताचा कोंडा व शेंगदाणा पेंड याचे 1:1 मिश्रण करून ते रात्रभर भिजत घालून दुसर्‍या दिवशी गोळे करून माशांना खाद्य म्हणून देण्यात येते.

मका आणि 80 टक्के + सोयाबीन पीठ 20 टक्के + विटामिन पावडर 1 टक्के =  4 किलो आठवडा या प्रमाणात खाद्य मात्रा देण्यात येते.

या योजनेचे अर्थसहाय्य

अ) गोड्या पाण्यातील मत्स्य पालन करण्याकरता प्रति हेक्‍टरी लागणाऱ्या विविध घटकांचा तपशील खालील प्रमाणे आहे. शेततळ्याच्या आकारमानानुसार पन्नास टक्के रक्कम किंवा 50 हजार रुपये देण्यात येते.

Read  रब्बी फळपीक विमा योजना 2020-2021, 2021-2022, नानासाहेब कृषी संजीवनी योजना POCRA

1) प्राणवायू यंत्र विकत घेण्याकरता प्रति हेक्‍टरी 50 हजार रुपये मिळतील.

2) हापा, जाळी व इतर यंत्र घेण्याकरता प्रति हेक्‍टरी 60 हजार रुपये मिळतील. शेततळ्याच्या आकारमानानुसार उपयुक्त यंत्राची प्रत्यक्ष किंमत ग्राह्य धरून आणि याच्यासाठी 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 50 हजार रुपये अनुदान या ठिकाणी दिल्या जाते.

निविष्ठा खते व खाद्य करिता

ब) मत्स्य बोटुकली करता 5000 रुपये चूना 200 किलो ग्रॅम पर्यंत 1800 रुपये, युरिया 250 किलो ग्रॅम पर्यंत 1250 रुपये शेणखत 10000 किलो ग्रॅम 26500 रुपये पूरक खाद्य 2000 किलोग्राम पर्यंत 10000 रुपये. असे एकूण 44 हजार 550 रुपये शेततळ्याच्या आकाराच्या प्रमाणात सदर बाबी वरील खर्चाची प्रत्यक्ष किंमत असणार आहे.

असे एकूण अ आणि ब चे मिळून  एक हेक्‍टर शेततळे करता रुपये 1 लाख 54 हजार 550 रुपये खर्च अपेक्षित आहे याच्या 50 टक्के म्हणजेच प्रति हेक्‍टरी 75 हजार रुपयांच्या जवळपास अनुदान मिळेल.

dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळाच्या  माध्यमातून ऑनलाइन अर्ज करता येतील.

टीप शेततळ्याच्या आकारमानानुसार मुक्त मापदंडाप्रमाणे वरील घटकांच्या ते रकमेमध्ये आवश्यक बदल करण्यात यावा.

अशाप्रकारे मित्रांनो शेततळे मासे पालन व्यवसाय करता आपण शासनाकडून अनुदान घेऊ शकतो याकरता आपण जरूर अर्ज करावा आणि आमचा Shettale Matsyapalan Anudan Yojana हा लेख तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या बातमी मराठी Batmi Marathi व मराठी स्कूल Marathi School या ब्लॉगला अवश्य भेट द्या

Leave a Comment