ई फेरफार मिळणार फुकटात | Free Download e Ferfar

Free Download e Ferfar – शेतकरी मित्रांनो आता आपल्याला इ फेरफार फुकटात मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या वेळेची सुद्धा बचत होईल.

डिजिटल इंडिया अभियानांतर्गत महसूल विभागाच्या अनेक सेवा अनेक जिल्ह्यांमध्ये आता ऑनलाईन झालेले आहेत त्यामध्ये कुठलेही शुल्क न आकारता आणि विहित कालावधी मध्ये ई-फेरफार केल्या जात आहेत. त्यामुळे ई फेरफार करण्याची सेवा फुकटात आणि वेळेची बचत करणारी ठरत आहे.  शासनाच्या डिजिटल इंडिया अभियानाअंतर्गत महसूल विभागाच्या अनेक सेवा आता ऑनलाईन झालेले आहेत, त्यामुळे संबंधित सेवाकरिता नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये आता जाण्याची गरज राहिलेली नाही.

अनेक जिल्ह्यांमध्ये महसूल विभागाच्या अनेक सेवा आता ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामध्ये कुठलेही शुल्क न आकारता म्हणजेच निशुल्क तसेच 15 दिवसांच्या विहित कालावधी मध्ये ई-फेरफार केल्या जात आहेत, त्यामुळे आपल्याला मालमत्तांच्या फेरफारा करिता येणारा खर्च कमी आणि वेळ वाचणार आहे.

Read  Last Will and Testament | आजोबांच्या मालमत्तेवर नातवाचा किती अधिकार आहे?

होणारी पिळवणूक टाळता यावी

ही जी प्रणाली आहे ती प्रणाली पळून टाळण्यासाठी महसूल विभागाने कार्यान्वित केली आहे. ऑनलाइन पद्धतीने दिल्या जाणाऱ्या सेवांचे दर आता निश्चित करण्यात आलेले असून सेवा उपलब्ध करून देण्याचा विहित कालावधी देखील निश्चित करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने नागरिकांची आता आर्थिक पिळवणूक टाळण्याकरता महसूल विभागाची ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही

महसूल विभागामार्फत ई-फेरफार सह विविध अशा सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत विविध दाखले तसेच प्रमाणपत्र आणि अर्ज किंवा संबंधित कागदपत्रे प्राप्त करण्याकरता नागरिकांना संबंधित कार्यालयांमध्ये आताच जाण्याची गरज राहिली नाही.

Read  Maha Bhumi Abhilekh जमिनीची शासकीय मोजणी भूमी अभिलेख

ई फेरफार कसा तयार होतो?

  • मालमत्तेची खरेदी विक्री च्या व्यवहारा नंतर या संदर्भातील माहिती फेरफार याकरिता ऑनलाईन पद्धतीने संबंधित तलाठ्याच्या लॉगीनला जाते.
  • तलाठ्याकडून ऑनलाईन पद्धतीने ही माहिती संबंधित महसूल मंडळ अधिकाऱ्याकडे पाठवली जाते आणि त्यानंतर महसूल मंडळ अधिकाऱ्याकडून ही फेरफार मंजूर केला जात असतो व संबंधित मालमत्ता धारकास ई-फेरफार विहित नमुन्यामध्ये उपलब्ध होतो.

महसूल विभागाच्या कोणत्या सेवा आहेत ऑनलाईन?

महसूल विभागामार्फत आता मालमत्तांचा फेरफार, सातबारा, जातीचे प्रमाणपत्र, कोतवाल बुकाची नक्कल, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गतचा अर्ज, अधिवास प्रमाणपत्र, रेशन कार्ड करिता अर्ज इत्यादी प्रकारच्या सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत

आमच्या बातमी मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

Leave a Comment