भारत हा शेतीप्रधान देश असून त्यामध्ये अनेक जण शेती करतात व मागील काही दिवसांपूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. राज्यातील १० जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना सरकारने मदत देण्याचा निर्णयही केला आहे आणि लवकरच ही रक्कम राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमाही होणार आहे. व आपणास हे माहीत असणे गरजेचे आहे की किती शेतकऱ्यांना ती रक्कम मिळणार आहे व कधी मिळणार आहे. विविध राज्यांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतीचे व पिकाचे नुकसान झाले त्यासाठी मदत म्हणून सरकारने अतिवृष्टी व पूर्ण भरपाई हे मंजूर केली होती.