Aadhar Card Update | आधार कार्ड अपडेट |

Aadhar Card Update | आधार कार्ड अपडेट | देशातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुमचही आधार कार्ड 10 वर्ष जुना आहे का? आणि तुम्ही या आधी आधार कार्ड हे कधी अपडेट केलं होतं? तर मित्रांनो आता तुम्हाला लवकरच तुमच्या आधार कार्ड अपडेट करून घ्यावे लागेल. असा सल्ला आम्ही तुम्हाला देत नाही आहे कारण असा सल्ला युनिक आयडेंटिफिकेशन ऑर्थरिटी ऑफ इंडिया (Unique Identification Authority of India) यांनी दिला आहे . म्हणून आता देशातील नागरिकांना स्वतःचं आधार कार्ड अपडेट करणे हे अत्यंत गरजेचे आहे. याबद्दल आपण अधिक माहिती पुढे पाहूया.

Table of Contents

आधार कार्ड वरील कोणती माहिती ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अपडेट करायचे आहे. हेही पुढे जाणून घेऊया. आधार कार्ड अपडेट करा. अशी सूचना आधार कार्डच्या वेबसाईटवरही आहे. मित्रांनो आधार कार्ड अपडेट केल्याने तुमचेच काम सोपे होते तुमच्या कामांमध्ये सोपेपणा येऊन ते अचूक होते त्यासाठी नक्कीच आपण आधार कार्ड अपडेट केले पाहिजे. तुम्ही तुमच्या भागातील आधार केंद्रावर जाऊन तुमची योग्य माहिती देऊन तुमच्या आधार कार्ड अपडेट करू शकता. किंवा तुम्हालाही ही माहिती ऑनलाईन करता येते.

  • तुमच्या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार कार्डच्या Official Website जावे लागेल.

  • तेथे जाऊन तिथे लॉगिन करावे लागेल लॉगिन केल्यानंतर , तुमच्या आधार कार्डचा जो नंबर आहे तो टाकावा लागेल त्यानंतर त्याच्याकडे टाकून तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी (OTP) येईल तो ओटीपी(OTP) तेथे टाकावा लागणार.

  • ओटीपी(OTP)टाकल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल ज्याचे नाव माय(Myaadhar ) आधार असेल.

  • येथे तुम्हाला नवनवीन सेवा दिसतील त्यावर ऑनलाईन अपडेट सर्विसेस (Update Services) या पर्यायावर क्लिक करा.

  • त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये अपडेट आधार ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करा.

  • येथे आणखीन एक नवीन पेज ओपन झाल्यावर येथे आपल्याला आपल्या आधार कार्ड कसे अपडेट करावे याबद्दल अधिक माहिती मिळेल.

  • त्यानंतर तुम्ही तुमची जन्मतारीख असेल, नाव असेल, लिंग असेल, पत्ता असेल, अशी माहिती तुम्ही तेथे जाऊन भरू शकता,

  • तेथे तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल ऍड्रेस ही अपडेट होते किंवा तुमचे बायोमेट्रिक डाटा हाही तिथे अपडेट होतो.

  • सहजरीत्या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पन्नास रुपये लागतात.

समजा आपल्याला तिथे आपला पत्ता अपडेट करायचा आहे तर ऍड्रेस या रकान्यावर क्लिक केले असता आपण प्रोसेस टू अपडेट आधार यावर क्लिक केल्यानंतर करण डिटेल्स मध्ये आपला पत्ता दिसेल. आधार कार्ड अपडेट करत असताना आपण सिलेक्ट सपोर्टिंग डॉक्युमेंट टाईप यावर क्लिक केले असता आपण कागदपत्रे ही जोडू शकतो. यामध्येच व्हीव्ह डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंट वर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर एक सूचना येईल त्यामध्ये कंटिन्यू टू अपलोड वर क्लिक केल्यानंतर आपले डॉक्युमेंट हे अपलोड होईल आणि नेक्स्ट वर क्लिक केले असता पन्नास रुपये एवढे पेमेंट करायचे आहे. हे केल्यानंतर तुमची प्रक्रिया आहे पूर्ण होईल. त्यानंतर जे आपण पेमेंट करतो त्याची एक पावती भेटते त्या पावती मध्ये आपण जी माहिती अपडेट केलेली आहे ती तेथे लिहून येईल. आणि पुढच्या 30 दिवसांमध्ये आपले आधार कार्ड हे अपडेट होईल.आणि पोस्टाने आपल्या घरी येईल खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो अगर तुम्हालाही आधार कार्ड अपडेट करून दहा वर्षे झाली असतील तर आत्ताच तुमच्या आधार कार्ड हे अपडेट करा व याचे फायदे मिळवा. द्यावे

आमच्याशी जुळण्यासाठी येथे Click करा.

Read  Talathi Bharti Syllabus In Marathi 2023 | तलाठी भरती अभ्यासक्रम २०२३ नवीन माहिती .

Leave a Comment