खामगाव : शेतात जाण्यासाठी निघालेला कुटुंबातील एकुलत्या एक तरुणाचा मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री खामगाव-मेहकर रोडवरील आवार टोल नाक्याजवळ घडली.
तालुक्यातील आवार येथील अक्षय तुळशिराम सातपुते (२३) हा दुचाकीने (क्रमांक एमएच २८-बीएन ५३२३) शेतात हरभरा पिकाची राखण करण्यासाठी जात होता. त्यावेळी टोल नाक्याजवळ रात्री च्या सुमारास अज्ञात चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून त्याच्या दुचाकीला समोरून धडक दिली.
या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला, याप्रकरणी सागर श्रीराम गावंडे यांनी खामगाव ग्रामीण ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ मनोज चव्हाण करीत आहेत.