CLOSE AD

खामगाव शहरात दोन बनावट डॉक्टर जेरबंद! शिवाजीनगर ठाण्याच्या पथकाची कारवाई: बोगस डॉक्टरांचा गोरखधंदा सुरूच, आरोग्य विभागाकडून तपासणी आवश्यक

Published On: February 6, 2024
  1. खामगाव शहरात दोन बनावट डॉक्टर जखामगाव : शहरातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत विना परवाना वैद्यकीय व्यवसाय थाटणाऱ्या दोन बनावट डॉक्टरांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विरेंद्र सुरजितसिंग आणि सय्यद सिकंदर सय्यद अफसर अशी आरोपींची नावे आहेत. शहरातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, हरियाणा येथील विरेंद्र सुरजित सिंग आणि बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथील सय्यद सिकंदर सय्यद अफसर (३३) हे दोघे सजनपुरी जवळील एका धाब्या शेजारील सय्यद सादिक सय्यद गफार यांच्या घरात रुग्णांची तपासणी आणि औषधोपचार करीत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा मारला. त्यावेळी एका रुग्णाला सलाइन लावल्याचे आढळून आले. तसेच काही रुग्ण औषधोपचारासाठी आल्याचे आढळले. त्यांच्यावर दोघेजण उपचार करीत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे वैद्यकीय अर्हता प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी प्रमाणपत्र नसल्याचे सांगितले. दोघांची अंगझडती घेण्यात आल्यानंतर एकाकडे रोख ३३ हजार ६०० रूपये एक दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल, तर दुसऱ्याकडे एक सहा हजार रुपये किमतीचा मोबाइल, बिदू सिंग महेंद्रसिंग या नावाचे पॅरामेडिकल कौन्सलिंग पंजाब डिप्लोमा प्रमाणपत्र, बिट्ठ सिंग महेंद्रसिंग या नावाचे पॅरामेडिकल कौन्सिलिंग डिप्लोमा इन आयुर्वेदिक फार्मसी प्रमाणपत्र आदींसह इतर साहित्य असा ४९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल आढळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

शेतकरी

या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व चालू घडामोडी तसेच हवामान अंदाज, पिकाविषयी माहिती वाचयला मिळणार आहेत.

Leave a Comment