मला तू खूप आवडते’ असे म्हणून गैरवर्तन करीत मुलीचा रस्त्यात अडवून विनयभंग

 

 

खामगाव : रस्त्याने जात असलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका युवकाने रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केल्याची घटना शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर सोमवारी घडली. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एका गावातील अल्पवयीन मुलगी १ जानेवारीला काम आटोपून रस्त्याने जात होती. दरम्यान, तिच्या गावातीलच विठ्ठल शांताराम व्यवहारे (वय २०) याने तिचा पाठलाग करून तिला अडविले. तसेच तुला गाडीवर सोडून देतो, तू मला खूप आवडते’ असे म्हणून गैरवर्तन करीत तिचा विनयभंग केला. याबाबत मुलीने वडिलांना सांगितले. मुलीच्या वडिलांनी शहर पोलिस ठाण्याला तक्रार दिली. यावरून पोलिसांनी विठ्ठल शांताराम व्यवहारे याच्याविरुद्ध कलम ३४५, (डी), ३४१, भादंवी सहकलम ११ (व्हीआय) १२ पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment