बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई!

खामगाव :- बंदी असलेल्या घातक नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन जणांवर शहर पोलिसांनी सोमवारी सकाळी कारवाई करत त्यांच्याकडून ११ रील व नायलॉन मांजा जप्त केला आहे.मकरसंक्रातीचा सण जवळ आल्याने शहरात पतंगबाजीला ऊत आला असून शहरात अनेक ठिकाणी बंदी असलेल्या

नायलॉन मांजाची विक्री होत आहे.दरम्यान शहर पोलिसांनी मोची गल्ली भागात छापा मारुन ११०० रुपयाचा नायलॉन मांजा जप्त केला. याप्रकरणी वैध कैलाश धनराज आसेरी वय
५७ रा. मोची गल्ली व उत्तमचंद
गोरीलाल गोयल वय ६० रा आठवडी बाजार यांच्याविरुध्द कलम ३३६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Read  मला तू खूप आवडते' असे म्हणून गैरवर्तन करीत मुलीचा रस्त्यात अडवून विनयभंग

Leave a Comment