अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार; हायवे क्रमांक 53 वरची घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार; हायवे क्रमांक 53 वरची घटना

खामगाव : भरधाव अज्ञात वाहनाने

धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री १ वाजता राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा शहरानजिक घडली.

महामार्ग क्रमांक ५३ वर स्वाद हॉटेल समोर भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धम्मपाल रमेश सपकाळ (२२) रा. नायगाव याला धडक दिली. त्यानंतर वाहनचालक फरार झाला. या अपघातात युवकाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशन व नांदुरा पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह अॅम्बुलन्सद्वारे मलकापूर येथील रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३०४ गुन्हा दाखल केला.

Read  CWC PAK vs ENG Match | पाकिस्तानला इंग्लंड विरुद्ध किती धावा काढाव्या लागतील?

Leave a Comment