आदर्श नगरातील श्री संत गजानन महाराज मंदिरातील श्रीमद् भागवत कथा तथा अखंड हरिनाम सप्ताहाची ह.भ.प किसन महाराज झांबरे यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता

मलकापूर :- आदर्श नगरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात सालाबादा प्रमाणे यंदाही 9 व्या वर्षी भागवताचार्य ह.भ.प किसन महाराज झांबरे यांच्या अमृततुल्य वाणीतून दि.24 डिसेंबर रविवार ते दि.31डिसेंबर रविवार पर्यंत श्रीमद् भागवत कथा तथा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते.

श्रीमद् भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताहात सकाळी 5 ते 6 काकड आरती, सकाळी 6 ते 7 विष्णू सहस्त्रनाम, दुपारी 12 ते 4 भागवत कथा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 8 ते 10 हरिकीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला असुन त्यात रविवार दि. 24 डिसें ह.भ.प सुभाष महाराज भालोदकर, सोमवार दि.25 डिसेंबर ह.भ.प पंढरीनाथ महाराज कोऱ्हाळा बाजार, मंगळवार दि. 26 डिसेंबर ह.भ.प नारायण महाराज ढासाळेकर, बुधवार दि. 27 डिसेंबर हा.भ.प पुंजाजी महाराज मलकापूरकर,गुरुवार दि. 28 डिसेंबर ह.भ.प संजय महाराज फत्तेपूरकर, शुक्रवार दि. 29 डिसेंबर ह.भ.प अशोक महाराज वनकोठा, शनिवार दि. 30 डिसेंबर ह.भ.प सिद्धेश महाराज देवळसगांव यांचे हरिकीर्तन झाले. रविवार दि. 31 डिसेंबर 23 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत भाविक भक्तगणांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले,सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत आदर्श नगर परिक्रमा करीत भव्यदिव्य ग्रंथ दिंडी सोहळा संपन्न झाला, दि. 31 डिसेंबर रविवार रोजी रात्री 8 ते 10 ह.भ.प किसन महाराज झांबरे मलकापूर यांच्या काल्याचा कीर्तनाचा कार्यक्रमाने भागवत कथेची सांगता करण्यात आली, या भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन जय गजानन मित्र मंडळ आदर्श नगर च्या वतीने करण्यात आले होते.

Leave a Comment