अतिक्रमित जागेवर ताबा करुन मायलेकांसोबत तिघांनी रस्ता अडविल्याप्रकरणी अपंग बाधवासह कुटुंबीयानी प्रजासत्ताक दिनी दिला आमरण उपोषणाचा इशारा बिट जमादारासह, सरपंच, पोलीस पाटील पाठराखण करीत असल्याचा अपंग बाधवाचा आरोप

मलकापुर:- तालुक्यातील ग्राम लोणवडी येथील गेल्या पस्तीस वर्षांपासून रहिवासी असलेल्या शासकीय जागेवर भर रस्त्यात मायलेकांसोबत तिघांनी अतिक्रमण करून रस्ता अडविल्याप्रकरणी मलकापुर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अपंग रामा धोंडू दोळे सह सात जणांनी एका निवेदनाद्वारे तक्रार केली असून पाच दिवसांत ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करून द्यावा अन्यथा प्रजासत्ताक दिनी परीवारासह मलकापुर येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दोळे परीवाराने आज दि.21 जानेवारी 24 रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे..

निवेदनात नमूद केले आहे की, आम्ही दोळे परिवार गेल्या 35 वर्षापासून लोणवडी येथे राहत आहे आमच्या वापराच्या रस्त्यात दिनकर निना दोळे याने टिन पत्राचे घर बांधून रस्ता अडविला आहे, वास्तविक पाहता दिनकर दोळे याचे गावात पक्के घर असून त्याने सरकारी जागेत अतिक्रमण करून आमचा रस्ता अडविला आहे, दिनकर दोळे याने ग्रामपंचायतीच्या नमुना आठ अ पेक्षा जास्त प्रमाणात जागा ताब्यात घेतली आहे, तसेच देवकाबाई जयंत बावस्कर यांना शासकीय जागेवर घरकुल योजनेचा लाभ मिळाला असुन देवकाबाई हिने ग्रा.प.च्या नमुना 8 अपेक्षा जास्त जागा ताब्यात घेतली आमचा जाण्यायेण्याचा रस्ता अडविला आहे.तिचा मुलगा दिलीप जयंत बावस्कर याचा ग्रामपंचायत मध्ये शासकीय जागेवर कुठलाही नमुना आठ अ नसतांना तो सरकारी जागेवर बांधकाम करून रस्ता अडवित आहे ,ग्रामपंचायत ने दिलीप बावस्कर यांना सदर बांधकाम करण्याची परवानगी दिली आहे ? दिलीप बावस्कर याला बांधकाम करण्याची परवानगी दिली असल्यास ग्रा.प मधील त्याच्या जागेची, नमुना आठ अ ची माहिती लेखी देण्यात यावी अशी मागणी दोळे परीवाराचे वतीने करण्यात आली आहे.
रामा धोंडू दोळे याचा दोन वर्षांपूर्वी झालेल्या मोटार सायकल अपघातात उजवा पाय निकामी झाला असुन आमचा जाण्यायेण्याचा रस्ता दिनकर दोळे, देवकाबाई जयंत बावस्कर,व आता नव्याने अतिक्रमण करुन दिलीप जयंत बावस्कर हा अडवित आहे,या तिघांनी कायदा व सुव्यवस्था धाब्यावर टांगली असुन त्यांना सरपंच, पोलीस पाटील,बिट जमादारासह तिघांचे अभय असल्याने ते आजमितीला हि राजरोसपणे भर रस्त्यात बांधकाम करून अतिक्रमण करीत आहेत.तरी पं.स अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामीण पोलीस निरीक्षक यांनी उपरोक्त तिघांविरुद्ध कायदेशीर कारवाई करुन ग्राम पंचायत ला नोंद असलेल्या नमुना आठ अ प्रमाणे त्यांची जागा मोजून त्यांच्या ताब्यातील अतिक्रमीत जागा शासनाचे ताब्यात घेऊन आमच्या परिवाराचा वहिवाट करण्याचा रस्ता मोकळा करून द्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने प्रजासत्ताक दिनी दि.26 जानेवारी 24 रोजी परीवारासह मलकापुर येथील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा एका निवेदनाद्वारे लक्ष्मण धोंडू दोळे,रामा धोंडू दोळे, तुषार रामा दोळे, पवन लक्ष्‍मण दोळे, दिलीप रामा दोळे, सागर रामा दोळे आदींनी दिला आहे निवेदनाच्या प्रती सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी पंचायत समिती मलकापुर ,ग्रामीण पोलीस निरीक्षक यांना दिल्या आहे.

Leave a Comment