मलकापूर – येथून जवळच असलेल्या विद्या विकास प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाकोडी शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा 2023-24 दि. 05.01. 2024 व दि. 06.01.2024 शुक्रवार व शनिवार या दोन दिवसादरम्यान दु. 3 ते रात्री 8.30 वा दरम्यान एस. डी. पाटील प्राथ. माध्यमिक व उच्च माध्यमिक इंग्लिश स्कुल चिंचपूर फाटा डीडोळा येथील शाळेच्या भव्य मैदानावर थाटामाटात संपन्न झाला.
दि. 05. 01. 2024 रोजी स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी, शिक्षक वृंद व कर्मचारी यांची सकाळपासूनच जय्यत तयारी सुरु होती. सायं. 4. 00. वाजता नियोजनबद्धपणे रंगारंग संस्कृतिक कार्यक्रमांची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. उदघाटन सोहळयासाठी निमंत्रीत पाहुणे आपल्या नियोजित वेळेनुसार ठीक 5.30 वा. उपस्थित झाली. त्यानंतर लगेंच आयोजित उदघाटन सोहळा संपन्न करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सदस्य तथा प्राध्या. अमोल पाटीलसर हे होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे संस्थापक तसेंच संस्था सचिव एस.डी. पाटीलसर उपस्थित होते. त्याचप्रमाणे संस्थाध्यक्ष प्रा. हितेश पाटील सरही याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. संस्था सदस्य सौ. रेश्माताई पाटील, संस्था सदस्य सौ. सुनंदाताई अढाव यांसह विद्या विकास माध्य.व उच्च माध्य. विद्यालय मु.अ. दिलीपकुमार अढावसर व प्राथमिक शाळा मुख्याध्यापक राहुल गायकवाडसर इ. मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष, उदघाटक तथा उपस्थित मान्यवर यांनी सर्वप्रथम दीप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचे औपचारिक उदघाटन झाल्याचे जाहीर केले. याच दिवसाचे औचित्य साधून विद्यालयात विद्यार्थी ने आण करण्याचे अत्यंत महत्वाचे काम करणाऱ्या विविध वाहन चालक वाहक यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी अगदी मोजक्या शब्दात कार्यक्रमाचे महत्व समजावीत सर्व सह्भागी विद्यार्थ्यांना त्याच्या सर्वोत्तम कला सादर करण्यासाठीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यानंतर पुन्हा मान्यवरांनी मंचकावरून खाली उतरत आपली जागा घेतल्यानंतर पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रमाला रंगत आली. विद्या विकास प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम तयारीसह आपले नृत्य, कला अभिनय सादर केले. आपल्या प्राचीन संस्कृतीपासून तर आधुनिक संस्कृतीची सुंदर छबी त्यांनी आपल्या कलेतुन साकार केलेली जाणवत होती. भव्य असा मंच सुंदर रोशनाईने शाळा परिसर प्रकाशमान झालेला दिसत होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जु. कॉलेजच्या प्राध्या. सौ. निकेशा पाटील मॅडम व प्राथ. शाळा शिक्षक रुपेश वेरूळकर सर यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार माध्यमिक शाळेचे शिक्षक एस. व्ही. तायडे सर यांनी व्यक्त केले. दुसऱ्या दिवशी एस. डी. पाटील प्राथ. माध्य.व उच्च माध्य. शाळा चिंचपूर येथील शाळेच्या विद्यार्थ्यानी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.