हरवलेल्या मुलीचा आठ तासात शोध घेऊन केले मातेच्या’ स्वाधीन, नयनाश्रूंनी आई-वडिलांनी मानले पोलीस निरीक्षक विलास पाटील यांचे आभार!

उमेश ईटणारे

मलकापूर :- हरवलेल्या मुलीचा आठ तासात शोध घेऊन तिला अमरावती येथून सुखरूप परत आणून आई-वडिलांच्या स्वाधीन केले. काल दि.3.1.24 रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास एक आई पोलीस स्टेशन मध्ये रडत आक्रोश करत आली होती. माझी मुलगी हरवली ती लहान आहे साहेब तुम्ही तिचा शोध घ्या अशी विनंती करत होती. मुलगी हरवल्याने ती आई चिंताग्रस्त झाली होती. चिंताग्रस्त झालेल्या आईला आधार देऊन पो.निरीक्षक विलास पाटील यांनी मुली बाबत विचारपूस केली असता मुलीकडे मोबाईल असल्याचे आईने सांगितले. पोलिसांनी तात्काळ शोध घेण्यास सुरुवात केली. मुलीच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले असता मोबाईलचे लोकेशन अमरावती येथील रेल्वे टेशनवर ट्रेस झाले. पो. निरीक्षकांनी तात्काळ पोलीस अंमलदार पंजाब शेळके व महिला अंमलदार राठोड यांना अमरावती येथे खाजगी वाहनाने रवाना केले. मुलीला रात्री तीन वाजताच्या सुमारास अमरावती येथील रेल्वे स्टेशन वरून ताब्यात घेऊन सकाळी मुलीच्या आई वडिलांना बोलावून मुलीला सुखरूप त्यांच्या ताब्यात देण्यात आले. मुलीला बघून आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.नयनाश्रूंनी आई वडिलांनी मलकापूर शहर पोलिसांचे आभार मानले!

Read  महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन;

Leave a Comment