मलकापूरच्या बोदवड रोडवर असलेल्या अनुप हॉटेलमध्ये सुरू होता कुटनखाना; पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांनसह हॉटेल मालकाला ताब्यात घेऊन केली कारवाई ; तीन जण पळून जाण्यात यशस्वी

मलकापूर:- कॅफे बरोबरच हॉटेलच्या नावावर कुटनखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या आधारे पोलिसांनी 4 डिसेंबर रोजी बोदवड रोडवर असलेल्या अनुप हॉटेलवर छापा टाकून दोन महिला सह हॉटेल मालकाला ताब्यात घेऊन मुंबई अक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे तर 3 तरुण पळून जाण्यात यशस्वी झाले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक विलास पाटील व लेडी सिंघम स्मिता म्हसाये यांची कॅफे चालकांवर तसेच अश्लील कृत्य करणाऱ्यावर करडी नजर आहे. या पूर्वी अश्या घटनाना मलकापूर शहरात उत आला होता मात्र या घटनांना वेळेतच या दोन्ही अधिकाऱ्यांनी मोडून काढले होते. मात्र असं असतांना सुद्धा बोदवड रोडवर असलेल्या अनुप हॉटेलमध्ये हॉटेलच्या नावाखाली कुटनखाना सुरू असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून 2 महिला सह हॉटेल मालकाला ताब्यात घेऊन त्यांच्यावर मुंबई अक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे मात्र 3 तरुण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.
तर मलकापूर शहराच्या कोणत्याही काण्याकोपऱ्यामध्ये अवैध कॅफे चालक तसेच हॉटेलवर होणारे गैरकृत्य असे होत असल्यास आमच्याशी संपर्क साधा असे आवाहन पोलिस निरीक्षक विलास पाटील व स्मिता म्हसाये यांनी केले आहे.

Leave a Comment