शेतकरी मित्रांनो उर्वरित 9 जिल्ह्यांना अतिवृष्टी मदत जाहीर झालेली आहे. 27 ऑक्टोबर 2021 च्या शासन निर्णयाप्रमाणे ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत.
विभागीय आयुक्त कोकण औरंगाबाद नाशिक व नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार संदर्भात दिन क्रमांक चार च्या शासन निर्णयान्वये तूर्तास 75 टक्के निधी वितरित करण्यात आला आहे दरम्यानच्या कालावधीत विभागीय आयुक्त पुणे अमरावती व विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून जिल्हाधिकारी नाशिक जळगाव जिल्हा करिता तसेच विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडून गोंदिया जिल्हा करता संदर्भातील क्रमांक पाच ते आठ येथील पद पत्रान्वये प्राप्त झाले आहेत त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती
ऑगस्ट ते सप्टेंबर 2019 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसानीसाठी बाधितांना मदत केली देण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भातील क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी तूर्त 75 टक्के असा एकूण अक्षरी रुपये 774 कोटी 15 लाख 43 हजार फक्त इतका निधी शासन निर्णय सोबत जोडलेल्या सर्व पत्रात जिल्हा निहाय दर्शवल्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.
सोलापूर, गोंदिया, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, नाशिक, व जळगाव जिल्ह्यात करता हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सविस्तर जीआर बघण्याकरता खाली क्लिक करा.
अतिवष्टी मदत जी. आर. पाहण्यासाठी येथे क्लीक करा