Kukkutpalan Anudan मित्रांनो आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी बचत गटांकरता शासनाकडून काही महत्त्वपूर्ण योजना राबविल्या जात असतात. ज्यामध्ये कुक्कुटपालन योजना खूप महत्त्वपूर्ण आहे. या योजनेअंतर्गत आदिवासी बचत गटांना शेड बांधकामाकरिता तसेच छोट्या पक्षांच्या खरेदी करता पशुखाद्य बरोबरच आवश्यक साहित्य खरेदी करण्याकरता पाच लाख पंचवीस हजारापर्यंत (5.25 लाख) आदिवासी विकास माध्यमातून सरकार देत असते. तर मित्रांनो याच योजनेकरता आता अर्ज सुरू झालेले आहेत.
Mhani in Marathi करीता येथे क्लिक करा
कुक्कुटपालन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प Kukkutpalan Anudan
या योजने करता जास्तीत जास्त आदिवासी बचत गटांनी अर्ज कराकरावे, असे आव्हान आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. यासंबंधीचे एक प्रसिद्धी पत्रक सुद्धा काढण्यात आलेले आहे. मित्रांनो राज्यांमधील विविध भागांमध्ये राहत असलेल्या आदिवासी बांधवान करता त्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आदिवासी विकास विभागाकडून विविध स्वरूपाच्या योजना राबविल्या जात असतात मित्रांनो शेती ही पावसावर आधारित असल्याकारणाने त्यामधून पाहिजे तशी उत्पन्नाची शाश्वती नसते.
त्यामुळे आदिवासी भागांमध्ये शेतीत राबणारे शेतकरी जोडधंदा म्हणून कुक्कुट पालन करू शकतील, हा त्यांच्याकरता उत्तम पर्याय आहे. त्याकरता आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी विकास प्रकल्प नाशिक, राजूर, कळवा, नंदुरबार, तळोदा, शहापूर, धुळे, आणि पेन या कार्यक्षेत्र मधील आदिवासी च्या स्वयंसेवी बचत गटांना करिता एकात्मिक कुक्कुट पालन योजने च्या माध्यमातून व्यावसायिक पद्धतीने कुक्कुटपालन Kukkutpalan Anudan करण्याकरता अर्थसाहाय्य करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना राबवण्यात येणार आहे. यामध्ये पात्रतेचे काही निकष आहेत ते आपण खालील प्रमाणे बघू.
पात्र बचत गट निकष (Kukkutpalan Anudan)
गटातील सर्व सदस्य हे अनुसूचित जमातीचे असावेत.
बचत गटाचा बँकेकडे असलेल्या खात्यातील व्यवहार चालू असावा.
शासन निर्णयात नमूद असणारी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि बचत गटातील सर्व सदस्यांची रजिस्टर हमीपत्र हे पूर्ण असावेत.
या योजनेअंतर्गत सर्व पात्र बचत गटांना शेड बांधणी करिता अर्थसहाय्य सोबतच छोटे पक्षी पशुखाद्य व आवश्यक साहित्य पुरवले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी बचत गटांना 5.25 लाख रुपये शासन अनुदान देणार आहे. या सोबतच पक्षांच्या लसीकरण आणि संगोपनासाठी तसेच कुक्कुटपालन व्यवस्थापनासाठी आवश्यक प्रशिक्षण सुध्दा दिले जाणार आहे.
यानंतर कुक्कुटपालन व्यवसायातील नामांकित कंपन्यांसोबत करार पद्धतीने योजनेच्या अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एकात्मिक कुक्कुट पालन योजनेच्या अधिक माहितीकरता व अर्ज दाखल करण्याकरता संबंधित प्रकल्प कार्यालय यांच्याशी अर्ज करू इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकामध्ये कळविण्यात आले आहे.
तर अशाप्रकारे मित्रांनो जर आपला आदिवासी बचत गट असेल तर आपण कुक्कुटपालन ( Kukkutpalan Anudan ) या योजनेकरिता अर्ज करू शकता या करता आपल्याला संबंधित प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. आपण आमच्या बातमी मराठी Batmi Marathi या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
Mala helf maheje ki mi jene karun mi sotacha kahi bichnes taku shektoy asa kamit kami 5 lakh mala milava
Hi
शेळि पालन
Hame kukut palan vayvsay karnahe please margdarshion kare
Hame send ore paksi ke liye anudan chahiy
Sheli palan
Kukutpalan