मित्रांनो राज्यांमध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीची लवकरच आपल्याला भरपाई म्हणून आर्थिक मदत केली जाणार असून त्याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करून महत्त्वाची माहिती दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ व इतर जिल्ह्यातील सुमारे 55 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून पहिल्या टप्प्यामध्ये 3700 कोटी रुपयांचा निधी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केल्या जाणार असल्याचे सांगितले आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असून त्यावेळी ते म्हणाले की अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वीच मदतीची रक्कम जमा केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न असणार आहे अतिवृष्टीमुळे 55 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून त्यापैकी 70 टक्के नुकसान हे मराठवाडा विभागामध्ये झालेले आहे त्यामुळे मदतीचा पहिला टप्पा हा मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्राधान्याने आम्ही वर्ग करणार आहोत.