group

Digital Satbara Utara Download Maharashtra डिजिटल सातबारा उतारा

आज आपण शासनाच्या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल माहिती पाहणार आहोत. विषय आहे, Digital Satbara Utara Download Maharashtra च्या संदर्भातील निर्णय. शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे सातबारा.  7/12 काढण्यासाठी तलाठी ऑफिस मध्ये चक्रा माराव्या लागतात.

Digital Satbara Utara Download Maharashtra डिजिटल सातबारा उतारा

मग या गोष्टींमध्ये खूप वेळ निघून जातो, तर हाच 7/12 शेतकऱ्यांना लवकरात लवकर उपलब्ध व्हावा व कमी खर्चात उपलब्ध व्हावा यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे.  तो म्हणजे डिजिटल सातबारा.

डिजिटल सातबारा सरकारी कामांसाठी वापरला जात नाही असे सुद्धा म्हटले जात होते, परंतु शासनाने याच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन,  एक परिपत्रक जाहीर केलं ते परिपत्रक कशासाठी आहे, हे आपण पाहणार आहोत.

या परिपत्रकात कशाचा उल्लेख केलेला आहे ते पाहूया. डिजिटल स्वाक्षरी डेटाबेस आधारित संगणीकृत अधिकार अभिलेखात गा. न.नं. 7/12, गा.न. नं. 8, गा.न. नं. 6, कायदेशीर वैधता देण्यासंदर्भात क्षेत्रीय महसुली प्राधिकारी व अधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत, महाराष्ट्र महसूल व वन विभाग शासनाने हे परिपत्रक जाहीर केले आहे.

Read  Panchayat Samiti Vihir Yojana Maharashtra 2022 | पंचायत समिती विहीर योजना २०२२

Tractor Anudan Yojana Subsidy Maharashtra ट्रॅक्टर स्प्रिंकलर पाईप अनुदान

डिजिटल सातबारा उतारा

23 जानेवारी, 2013 रोजी ई- फेरफार हा ऑनलाईन म्युटेशनचा कार्यक्रम सुरू करण्यात आला व त्याला मान्यता दिल्या गेली होती. त्यासाठी राष्ट्रीय विज्ञान केंद्र पुणे यांच्यामार्फत ई- फेरफार आज्ञावली विकसित करण्यात आलेली आहे. यालाच आपण e-chavadi असे देखील म्हणतो. या परिपत्रकात 3 डिसेंबर 2005 च्या संगणकीकृत अभिलेख अधिकाऱ्यांना वैधता देण्यात आली.

त्यानंतर 11 जुलै 2017 ला हस्तलिखित सातबारा बंद करण्यात यावा.  यासाठी ऑनलाईन सातबारा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याला शासनाने महाभूमी या संकेतस्थळावर अधिकार अभिलेख विषयक गाव नमुना 7/12, गाव नमुना 8, गाव नमुना 6 यांचे उतारे डिजीटल स्वरूपात उपलब्ध केले आहे.

याच्यानंतर 11 जुलै 2017 मध्ये हस्तलिखित गाव नमुना न. 7/12 पूर्णतः बंद करावेत, याच्यासाठी महाभूमी सातबारा उपलब्ध करून देण्यात आला होता.  याला आपण त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 148 मध्ये योग्य ते साठवणुकीचे तंत्र वापरून अभिलेख अधिकार ठेवणे.

Read  खतावर 148 टक्के सबसिडी - केंद्र शासनाचा निर्णय Fertilizer Subsidy

याविषयीची तरतूद माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 2006 कलम 4, 5, 6, 7 आणि 8 मध्ये कोणतीही सार्वजनिक दस्तऐवज डिजिटल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जतन केले जात असलेले, डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित अभिलेख हे जणू काही मूळ अभिलेखाचे सत्यप्रत आहे.

saur krushi pump yojana maharashtra सौर कृषी योजना

Digital Satbara Utara Download Maharashtra

या विषयाची तरतूद आहे तसेच डिजिटल स्वाक्षरी डेटाबेस आधारित संगणकीकृत अधिकार अभिलेखात गाव न. नं 7/12, गाव न.नं. 8अ, गाव न.नं.6 कायदेशीर वैधता देण्यासंदर्भात क्षेत्रीय महसूल अधिकार प्राधिकारी आणि संबंधित सक्षम प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती. माहिती परिपत्रकामध्ये काय होतं ते आपण पाहूया.

माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या कलम 4, 5, 6, 7 व 8 मधील तरतूद आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या तयार करणे व सुव्यवस्थित ठेवणे. 1971 मधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकारात क्षेत्रीय महसुली यंत्रणा व प्राधिकरण आणि संबंधित सक्षम अधिकारी यांना खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

Read  जमीन खरेदी विक्री नियम

शासनाच्या महाभूमी पोर्टलवर ” https//mahabhumi.gov.in” या संकेत स्थळावर उपलब्ध होणारे क्यूआर कोड किंवा सोळा अंकी पडताळणी क्रमांक असलेले डिजिटल स्वाक्षरी डेटाबेस आधारित संगणीकृत गाव नमुना सातबारा, गाव नमुना  आठ अ आणि गाव नमुना 6 इत्यादी नमुन्यांचा अधिकार अभिलेख विषयक उतारा सर्व कायदेशीर व शासकीय निम- शासकीय कामकाजासाठी वैद्य राहील.

अशा डिजिटल स्वाक्षरीत डाटाबेस आधारित संगणकीकृत गाव न.नं. 7/12, गाव न. नं. 8अ आणि गाव न. नं. 6 वर तलाठी अथवा अन्य कोणत्याही अधिकारी यांची स्वाक्षरी असण्याची आवश्यकता नाही. सर्व जिल्हाधिकारी व क्षेत्रीय महसूल अधिकारी व अधिकारी यांनी या निषेध निर्देशांची तात्काळ अंमलबजावणी करावी.

अशा प्रकारच्या सूचना सुद्धा या परिपत्रकात दिलेल्या आहेत. अशा या परिपत्रकामुळे डिजिटल सातबारा सर्वत्र वैद्य मानला जाईल.  हा स्वतःच्या मोबाईल मधून स्वतः कसा डाऊनलोड करून घ्यायचा त्याची लिंक आपण वरती दिलेली आहे त्यानुसार तुम्ही हा सातबारा डाऊनलोड करून घेऊ शकता.  यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि इतर खर्च सुद्धा वाचेल.

satbara download करण्याकरीता येथे click करा

Originally posted 2022-03-22 07:07:40.

Categories GR
group

Leave a Comment

x