Pik Nuksan Bharpai 2021 पीक नुकसान भरपाई जाहीर

राजा मध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना अखेर ाज्य सरकारने पॅकेज जाहीर केले आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या पॅकेजची घोषणा केली आहे.

त्यानुसार आता पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आलेले आहे राज्यामध्ये आपण बघतो की जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत खूप पाऊस झाला त्याच प्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्‍टर हून अधिक क्षेत्रावर  शेती पिकाचे नुकसान सुद्धा झालेला आहे.

या नैसर्गिक संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून एन डी आर एफ च्या निकषाची वाट न बघता अखेर दहा हजार कोटींचे अर्थसहाय्य म्हणजे ज्यास आपण पॅकेज म्हणतो ते जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.

Read  RTO Challan Driving License | ड्रायव्हिंग लायसन्स ठेवायची गरज नाही?

मिळणारी मदत

जिरायती शेती करता दहा हजार रुपये प्रतिहेक्‍टर.

बागायती करता पंधरा हजार रुपये प्रति हेक्‍टर

बहुवार्षिक पिकांकरिता पंचविस हजार रुपये प्रति हेक्‍टर

ही मदत दोन हेक्टर मर्यादेपर्यंतच आहे. ही मदत साधारणता वरील प्रमाणे मिळू शकते.

 

Leave a Comment