Atiwrushti Madat 3721 Crore महाराष्ट्र राज्य मधील चौतीस जिल्ह्यांमधील 62 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे. राज्य सरकारकडे 5998 कोटींच्या भरपाईचे प्रस्ताव आहेत ते शासनाला प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार पहिला टप्पा जो मिळालेला आहे तो 2297 कोटींचा मिळालेला आहे तर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 2211 कोटींची मदत जाहीर झालेली आहे.
Atiwrushti Madat 3721 Crore शेतकऱ्यांना मदत
यामध्ये बघण्याजोगी गोष्ट म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे 30 टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याने एन डी आर एफ मधुन 3721 कोटींची मदत द्यावी असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.परतीचा पाऊस झाल्यामुळे लेट खरीप आणि खरीप हंगामातील एकूण 59 हजार 282 हेक्टर वरील कांदा खराब झालेला आहे, तर फळबागांना ही पावसाचा मोठा तडाखा बसला आहे.
मका असेल कापूस असेल यासह अन्य पिके पाण्याखाली गेली. त्यानंतर मुख्यमंत्री, अन्य मंत्र्यांनी, विरोधी पक्ष नेते अशा अनेकांनी अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी केली आणि त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मदतीची ग्वाही सुद्धा दिली होती.
याचाच भाग म्हणून 21 आणि 22 डिसेंबरला केंद्रीय पथकाने नुकसानीची पाहणी करून मुख्य नुकसाग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनात मधून म्हणजेच एनडीआरएफ मधून मदत मागितलेली आहे.
नुकसान झाल्यानंतर दोन महिन्याने केंद्रीय पथकाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी केली. आता केंद्र सरकारने मदतीसाठी तरी विलंब करू नाही अशी अपेक्षा राज्य सरकार केंद्र सरकारकडुन करत आहे. राज्य सरकारने पुरवणी मागणी द्वारे अधिवेशनात मंजूर केलेली दुसऱ्या टप्प्यातील मदत जानेवारी 2019 मध्ये नुकसान ग्रस्तांच्या खात्यामध्ये टाकली जाईल असे मदत व पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे
आता बघू आपण राज्यातील नुकसानीची स्थिती कशी आहे
- राज्य सरकारकडून आतापर्यंत मदत मिळाली आहे ती म्हणजे 2297 कोटी
- एकूण बाधीत शेतकरी आहेत 62.17 लाख
- नुकसानीचे प्रस्ताव आहेत 59 89 कोटी
- केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव आहे 3721 कोटी रुपयांचा
पुरामुळे, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाने नुकतीच केलेली आहे. त्यानुसार राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आता 3721 कोटी रुपयांची मदत मागितली आहे अशाप्रकारे – सुभाष उमराणीकर उपसचिव मदत व पुनर्वसन मुंबई
यांनी म्हटले आहे