Ayurvedic Medicine Chia Seeds Production | आयुर्वेदिक चिया सीड्स उत्पन्न

Ayurvedic Medicine Chia Seeds Production – शेतीतून कमी वेळेत अधिकचा नफा औषधी चिया बियांणामध्ये कळंबच्या शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग :

केल्याने होते रे….आधी केलेची पाहिजे…!
यावरून आपल्या लक्षात येते की, मेहनत नेहमीच माणसाला यशस्वी बनवते. अशी एक म्हण प्रचलित आहे. शेती व्यवसयातून उत्पन्न वाढीसाठी शेतरकरी अनेक प्रयोग करीत असतो. तर अशाच एका शेतकऱ्याने यंदाच्या (Summer Season) उन्हाळी हंगामात झालेल्या पीक पध्दतीमधील बदलातून ते समोरही आले आहे. कळंब तालुक्यातील नामदेव माकोडे या शेतकऱ्याने एक यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे.

नामदेव यांनी (Ayurvedic Medicines) आयुर्वेदिक औषधे असणारे (Chia Seeds) चिया बियाणाचे उत्पन्न घेतले आहे. या प्रयोग जिल्ह्यासाठी वेगळा असला तरी त्यांनी तीन महिन्यांमध्ये यशस्वी करुन दाखवला आहे. राज्यातील बाजारपेठांमध्ये या बियाणांना मोठ्या प्रमाणात मागणी असून बाजारपेठेचा अभ्यास करुन हे पीक घेण्याचा निर्धार केल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे परस्थिती प्रतिकूल असली तरी शेतकरी हे नवनविन प्रयोग करुन उत्पन्न वाढवण्याचा कसा प्रयत्न करतात.

Read  National Farmer's Day | शेतकरी दिनाचे महत्व

चिया बियाणे काय ?

चिया बियाणे हे इतर खाद्य बियाणा प्रमाणेच आहेत. त्यांच्यामध्ये असलेल्या पोषक आणि औषधी गुणधर्मामुळे खाण्यामध्ये त्याचा वापर करतात. आरोग्या संबंधित समस्या दूर करण्यासाठी याचा अधिकचा उपयोग होतो. चिया बियाणांचा आकार खूप बारीक असून बियाणांचा रंग हा पांढरा, तपकिरी किंवा काळा असतो. पारंपरिक पिकांपेक्षा आता ज्यामधून अधिकचे उत्पन्न मिळेल अशाच पिकांवर युवा शेतकऱ्यांचे लक्ष आहे. त्यानुसारच कळंब सारख्या तालुक्यातील शिराढोणच्या शिवारात चिया बियाणाचे पिक बहरत आहे.

खर्च कमी व वेळेची बचत

चिया बियाणांची लागवडीला येणारा खर्च हा खूप कमी असतो. तसेच हे पीक इतर पिकांच्या तुलनेत खूप लवकर येते. चिया बियाणांची लागवड केल्यापासून तीन महिने 15 दिवसांमध्ये उत्पादन मिळते. नामदेव माकोडे यांनी चिया बियाणे हे हरियाणा येथून ऑनलाईनद्वारे मागवून घेतले होते. नोव्हेंबरमध्ये लागवड करण्यात आली होती तर आता हे पीक अंतिम टप्प्यात आहे. साडेतीन एकरातील या पिकासाठी माकोडे यांना केवळ 12 हजार रुपये खर्च आलेला आहे. यामध्ये त्यांना 2 लाखाचे उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे.

Read  पी एम किसान योजना २०२३ | PM Kisan Beneficiary Status 2023 List Check @pmkisan.gov.in

चिया बियाणांमध्ये औषधे गुणधर्म

चिया बियाणांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. चिया बियाणांमध्ये पोटॅशियम, फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, जस्त, तांबे, सोडियम फॉस्फरस, मॅगनिज आदी पोषक तत्त्व असतात. यामुळे चिया बियाणांना अधिकची मागणी असते. विशेष म्हणजे बारामाही महिने या बियाणांना मागणी असते. त्यामुळे दर हे टिकून असतात. कमी वेळेत अधिकचे उत्पन्न यासाठी हा योग्य पर्याय असून या भागातही उत्पादन घेता येत असल्याचे माकोडे यांनी सांगितले आहे. तुम्ही आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग सुरू ठेवा व अधिक उत्पन्न कमवा.

Ayurvedic Medicine Chia Seeds Production ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment