उन्हाळी कांदा लागवड तंत्रज्ञान | Kanda Lagwad lasalgaon

उन्हाळी कांद्याची लागवड तंत्रज्ञान 2021 उन्हाळी कांद्याची लगबग सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. साठवणुकीची मर्यादा असेल आयात असेल यामुळे कांद्याचे भाव कमी मिळतात परंतु यंदा कांद्याचे भाव बरेचसे टिकून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कांदा लागवडीकरता बराचसा उत्साह दिसून येत आहे.

या लेखामध्ये आपण कांदा लागवडीची पद्धती व कशामुळे कांदा उत्पादन जास्त होऊ शकते, हे आपण बघणार आहोत कांदा उत्पादनाकरिता कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत किंवा कोणत्या कारणाने कांदा उत्पादनावर परिणाम किंवा दुष्परिणाम होऊ शकतात.

कांदा लागवडीच्या वेळी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? उन्हाळी कांद्याची लागवड तंत्रज्ञान-

रोपावर करपा किंवा फुलकिडे यांपासून नियंत्रण मिळवण्यासाठी दहा लिटर पाण्यामध्ये 15 मिली मोनोक्रोटोफास व 25 ग्रॅम डायथेनियम 45 ते 50 ग्रॅम युरिया व दहा मिनिटे पर्यंत या सारखे चिकट द्रव्य मिसळून आपण दहा दिवसांच्या अंतराने चार ते पाच फवारण्या केल्या तरी चालतील.

रोप लागवडीत केव्हा योग्य असते?उन्हाळी कांद्याची लागवड तंत्रज्ञान-

जेव्हा रोपांना हरभऱ्याच्या आकाराची कांद्याची गाठ तयार झालेली असते तेव्हा आरोप लागवडीस योग्य आहे असे समजावे. रब्बीचे कांद्याची रोपे आठ-नऊ आठवड्यांनी तयार होतात तर खरीप कांद्याची रोपे सहा ते सात आठवड्यांनी तयार होत असतात आपण जेव्हा रोपे काढू ते अगोदर 24 तास गादी वाफ्यावर पुरेसे पाणी द्यावे. आपण कांद्याची लागवड करताना गादीवाफ्यावर किंवा सरी वरंब्यावर करावी.

आपण सपाट वाफे मध्ये रोपांचे प्रमाण जास्त असले तरी कांदा मात्र मध्यम आकाराचा मिळतो जेव्हा आपण सपाट वाफे ठेवू तेव्हा दोन मीटर रुंद व उताराप्रमाणे वाफ्याची लांबी आपण ठेवावी रोपांची लागवड करत असताना आपण रोपांची लागवड सकाळी किंवा संध्याकाळी करावी दुपारच्यावेळी करू नये आणि ती सुद्धा 12.5 बाय 7.5 सेंटीमीटर अंतरावर करावी

आपण कांदा लागवड रब्बी हंगामासाठी करत असाल तर दहा बाय दहा सेंटिमीटर अंतरावर कांद्याची लागवड करावी. (उन्हाळी कांदा लागवड तंत्रज्ञान) लागवड करण्यापूर्वी दहा लिटर पाण्यामध्ये दहा ग्रॅम कार्बनडायझिम प प्रोफेनोफॉस किंवा फिप्रोनील 10 मिली द्रावण टाकावे लागवड करताना रोपांची शेंडे कापून या द्रावणामध्ये बुडवून घ्यावीत आपण डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये लागवड करू शकता जेव्हा आपण ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांमध्ये पेरणी केली असेल.

कोणते बियाणे वापरावे?

कांदा लागवडीसाठी(उन्हाळी कांदा लागवड तंत्रज्ञान) आपण एन-2-4-1 हे बियाणे आपण जर वापरले तर कांदा आकाराने गोलाकार आणि मध्यम ते मोठा सुद्धा होतो. रंगलाल सर येतो आणि कांद्याला चकाकी येते. हे कांदे जवळपास पाच ते सहा महिने चांगल्या प्रकारे टिकतात सुद्धा, लागवडीनंतर आपण 120 दिवसांनी काढणी केली तर, हेक्‍टरी 25 ते 35 टन उत्पादन मिळते. आपल्याला कांदा उत्पादना करता भीमा शक्ती, अर्का निकेतन भीमा किरण, लाईट रेड, ऍग्री फाउंड हे बियाण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.

आज आपण पावसाळी कांदा याबद्दल माहिती बघूया. नेमका पावसाळी कांदा लागवड कशी करायची आणि त्याची काळजी कशी करायची जेणेकरून आपण पावसाळी कांदा हा चांगल्या प्रकारे घेऊ शकलो पाहिजे.  नेमकं कांद्याची लागवड कशा प्रकारे करायची या कांद्याच्या लागवडीसाठी आपणाला जमीन कशाप्रकारे तयार करावी लागेल हे सुद्धा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.कांद्याची लागवड करण्याअगोदर जमिनीचे नियोजन करणे हे अतिशय आवश्यक आहे. म्हणून कांदा पिकाची माहिती पाहू.

या नियोजनामध्ये जमिनीचं खरं व्यवस्थापन करणं सुद्धा गरजेचे आहे. कारण जमीन जर व्यवस्थित व या जमिनीमध्ये कांद्याच्या लागवडीसाठी (उन्हाळी कांदा लागवड तंत्रज्ञान) व्यवस्थित असलेले वाफे आहेत ते जर योग्य प्रमाणात केले तर कांदा हा अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा व दर्जेदार येऊ शकतो.

Read  Anganvadi Bharti 2023 | अंगणवाडी भरती 2023 |

कांद्याची लागवड योग्य प्रकारे कशी करावी कांदा हा ठिबक सिंचनावर चांगल्या प्रकारे लागवड जर करायची असली तर यासाठी ठिबक सिंचन असणे सुद्धा योग्य प्रकारे राहील, कारण 150 ते 180 सेंटिमीटर रुंदीचे कांद्यासाठी गादीवाफे तयार करणे सुद्धा गरजेचे असते.
एका वाफ्यावर दोन लॅटरल 60 सेंटिमीटर असं तर घेऊन त्यामध्ये दोन ड्रीप मध्ये 60 सेंटिमीटर अंतर योग्य ते ठेवावे कारण त्यावर ठिबक संच चालवून वापसा येईपर्यंत पाणी द्यायचे असते.

आणि हा वापसा आल्यावर दहा बाय दहा किंवा 11:11 सेंटिमीटर अंतरावर लागवड करणे योग्य राहील.  जेव्हा आपण कांद्याची लागवड करतो त्यावेळेस मध्‍यम कसदार, भुसभुशीत भारी अशी जमीन करावी म्हणजेच पाण्याचा त्यामध्ये उत्तम निचरा होणारी सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण आहे ते भरपूर असणे गरजेचे आहे व ते जमिनीत कांद्याचे चांगले उत्पन्न घेऊ शकतो.

 

सरी-वरंबा मध्ये किंवा सपाट वाफ्यामध्ये रोपांची पुनर्लागवड कशा प्रकारे करायची ते आपण खालील प्रमाणे बघू.

1) रोपे गादीवाफ्यावर तयार करून त्याची पुन्हा लागवड करण्याची जी पद्धत आहे ते आपण मोठ्या प्रमाणावर वापरतो, तसेच रोपे सपाट वाफ्यात किंवा सरी-वरंब्यावर लावली सुद्धा जातात.

2) सपाट वाफे जे असतात त्या वाफ्यामधी लागवड केली जाते ती लागवड सरी वरंब्यावर पेक्षा जास्त फायदेशीर, अतिउत्कृष्ट ठरू शकते.
कारण सपाट वाफ्यामध्ये रोपांची संख्या सरी वरंब्यात पेक्षा जास्त बसते आणि रोपांच्या वाढीला चांगला वाव मिळतो .

3) सरी-वरंबा जो असतो त्याच्या मध्यावर 45 बाय 10 सेंटिमीटर चे रोप लागवड करावी तरी च्या वरच्या भागात लावलेला कांदा जो असतो तो चांगला पोसतो. तर तळातील कांदा जो असतो तो लहान राहतो.
खरीप या हंगामामध्ये ज्या शेतात पाण्याचा निचरा होत नाही अशा जमिनीत मात्र लागवड सरी वरंब्यावर करावी हे योग्य राहील.

4) त्यानंतर आपण केव्हाही जमिनीचा उतार बघून दोन मीटर रुंद आणि तीन ते पाच मीटर अशा प्रकारची लांबीचे वाफे तयार करावेत, जमीन सपाट जर असेल तर वाफ्याची लांबी आणखी आपण वाढवू शकतो आणि ती वाढवता सुद्धा येते.  सपाट वाफ्यामध्ये लागवड नेहमी कोरड्या जमिनीत करावी आणि नंतरच त्याला पाणी द्यावे म्हणजेच सरी वरंब्यात जीवाचे असतात.

त्या वाफ्यांना पाणी दिल्यानंतर आपण हिची लागवड आहे ती चांगल्या प्रकारे करू शकतो आणि जे गादी वाफ्यावर लागवड करून कांद्याचे पीक घेता येते.  अतिशय उत्कृष्ट प्रकारे घेता येते लागवडीपूर्वी जमिनीत चांगले कुजलेले व सडलेले शेणखत मिसळावे त्यामुळे कांदा हा भरघोस उत्पन्न देऊ शकतो.

ठिबक सिंचनावरील लागवड

1) ज्यावेळी कांद्याची लागवड (उन्हाळी कांदा लागवड तंत्रज्ञान) आपल्याकडे साधारणता सपाट वाफा अशा पद्धतीने किंवा सरी वरंबा अशा पद्धतीवर केली जाते.
कांद्याची उत्पादकता कमी असण्याचा प्रमुख कारणांमध्ये पाण्याचे व्यवस्थापन योग्य पद्धत, सुधारित जातीचा अभाव, असंतुलित पोषणाचा प्रकार एकरी रोपांची संख्या पिकाचे संरक्षण असतं

त्याच्याकडे आपण केलेलं दुर्लक्ष आहे ते दुर्लक्ष या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या शास्त्रीय दृष्ट्या व भौगोलिक दृष्ट्या अभ्यास करूनच कांद्याचं चांगल्या प्रकारे आणि आधुनिक ठिबक सिंचन पद्धतीने दोनशे ते सव्वादोनशे क्विंटल एवढे उत्पादन मिळू शकतो.

2) कांद्याची लागवड करताना आपण ज्यावेळेस कांद्याला पाणी देतो त्या पाण्याची योग्य व्यवस्थापन असून सुद्धा तेवढेच गरजेचे आहे.
कारण, कांद्याला आणि अति जास्त पाणीसुद्धा देणे हे हानिकारक ठरू शकत.

3) ज्यावेळेस आपण ठिबक सिंचन ही पद्धत वापरतो त्या वेळेस कांदा लागवड कसा करायचा तर 150 ते 180 सेंटिमीटर रुंदीचे अगोदर गादी वाफे तयार करावे आणि एका वाक्यावर दोन लॅटरल 60 सेंटिमीटर अंतरावर पसरवून घ्याव्यात.  त्यानंतर दोन ड्रीप के अंतर आहे ते 60 सेंटिमीटर एवढी ठेवावी आणि वाफेवर ठिबक संच लावा आणि तो चालवून वापरता येईपर्यंत योग्य प्रकारे पाणी द्यावे आणि वाफसा आल्यावर दहा बाय दहा सेंटिमीटर एवढं तर घेणे गरजेचे आहे व ते अंतर घेऊन लागवड चांगल्या प्रकारे करावी.

Read  Wangi Lagwad | वांग्याची लागवड कशी करायची?

कांद्या विषयी इतर माहिती

कांद्या (उन्हाळी कांदा लागवड तंत्रज्ञान) विषयी आपणास काही बऱ्याच प्रमाणात माहिती मिळत असतात कांदा हा उत्पादन व क्षेत्राच्या बाबतीत जर बघितला तर भारत आपल्या जगात सर्वात महत्त्वाच्या क्रमांकावर मानला जातो.  कांद्याचे उत्पादन आहे ते उत्पादन इतर देशांच्या बाबतीत आपल्या भारताचा सर्वप्रथम नंबर लागतो.

कांदा पिकविणाऱ्या राज्यात क्षेत्र उत्पादन या दोन्ही दृष्टीने गुजरात आंध्रप्रदेश कर्नाटक महाराष्ट्र राज्य आहेत हे आघाडीवर आहेत.  भारतात कांद्याच्या जवळजवळ बऱ्याच जाती आपल्याला आढळून येतात तरी त्या जाती पैकी 33 जाती चांगल्या प्रकारे ह्या विकसित आलेल्या आहेत तशाच प्रकारे भारतात जे कांद्याचे उत्पादन आहे ते अतिशय चांगल्या प्रमाणात व दर्जेदार पद्धतीने घेतले जाते.

तसेच आपल्या मध्ये तीन ते पाच जाती ह्या प्रामुख्याने लागवडीसाठी अति जास्त प्रमाणात वापरल्या जातात. कांद्याचे क्षेत्राचा विचार केला तर सुधारित जाती खाली फक्त तीस टक्के क्षेत्र येते बाकी क्षेत्रावर शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेली बियाणेअसतात . त्याची सुद्धा ते लागवड करतात.  काही शेतकरी नियम सुद्धा पाळत नाहीत त्यामुळे काय होतं जे शेतकरी त्या वाणाला स्वतः तयार करून वापरतात.

त्या वानांमध्ये नकळतपणे अति निकृष्ट पणा येतो व कांदा याचे उत्पादन चांगल्या प्रकारे येत नाही तर कांद्याची हे तपासून व शाश्वती असलेले घ्यावे. बरेच शेतकरी अशा प्रकारची बी वापरतात जीबी काहीच सरस्वतीचे नसते त्यामुळे हे शेतकऱ्याची बी आहे ते बर्‍याच प्रमाणात वाया जाते.

कांद्याचे बियाणे आता आपण कांद्याचे बियाणे विषयी काही माहिती बघूया कांद्याचे बियाणे हे जे असतं. हे अतिशय कमी आयुष्य असतं त्याची उगवण क्षमता आहे .हे एका वर्षापूर्वी पुरतीच टिकून राहते. त्या कारणाने काय होतो की कांदा बियाण्याचे उत्पादन दरवर्षी आपल्याला घ्यावेच लागते.  कांदा बियाण्याचे उत्पादन घेण्यासाठी कमीत कमी दोन वर्षाचा कालावधी लागतो.  पहिल्या वर्षांमध्ये जे काही आपण तयार करतो या बियाण्यांपासून बाकीचे मात्र कंद तयार करावेत त्याच्या नंतर दुसऱ्या वर्षी या कणांपासून बियाणे उत्पादन करू शकतो त्या उत्पादनाचा एक विशेष असा आढावा घ्यावा कांद्याच्या उत्पादनाची पद्धत आहे ती पद्धत आपण अतिशय चांगल्या प्रमाणे करू शकतो.

कांद्यापासून बियाण तयार करण्याची पद्धत

कंदापासून (उन्हाळी कांदा लागवड तंत्रज्ञान) जर आपल्याला बियांना तयार करायचं असेल तर या पद्धतीमध्ये सर्वप्रथम कंद तयार ज्यावेळेस होतात त्या वेळेत तयार कंद झाल्यानंतर ते काढून घेतात व अतिशय चांगल्या प्रकारे निवडून पुन्हा त्याची लागवड आपल्या शेतामध्ये केली जाते.  या लागवडीमुळे कंद योग्य निवडला जातो यामुळे त्याची निवड चांगल्या प्रकारे सुद्धा होते.

अतिशय शुद्ध बियाणं जर तयार झालं तर ते शुद्ध बियाणं तयार होऊन उत्पन्न सुद्धा चांगल्या प्रमाणात भरघोस पद्धतीने येते. ही जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये थोडा खर्च सुद्धा वाढतो मात्र वेळ देखील जास्त लागते.  पण त्याचे उत्पादन आहे हे पिकाच्या उत्पादनासाठी ही पद्धत अतिशय योग्य आणि चांगली आहे.

दुसरी पद्धत म्हणजे एका वर्षाची पद्धत ह्या पद्धतीला आपण एकेरी किंवा एक वर्षे पद्धतसुद्धा म्हणू शकतो ही जी पद्धत आहे. या पद्धतीमध्ये मी जून महिन्यात पेरणी करायची व पेरणी करून रोपे लावणे जुलै-ऑगस्टमध्ये करायची नोव्हेंबर महिन्यात तयार होतील व कंद तयार काढून निवडून घेतले जातात.

चांगल्या कंदांची दहा पंधरा ते सोळा दिवसानंतर पुन्हा दुसऱ्या शेतात लागवड करण्यात येते. या पद्धतीमुळे मे महिन्यापर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे तयार होतं आणि हेच बियाने एक वर्षात तयार झाल्यानंतर याला एक वर्षे पद्धत असे सुद्धा म्हटल्या जाते या पद्धतीने जे खरीप कांदा आहे. या खरीप पाण्याच्या प्रजातींचे बीजाचं उत्पादन आहे ती योग्य प्रकारे घेतल्या जातात.

Read  शेतकऱ्यांनी नांगरणी कोणत्या वेळी करावी?

कांद्याच्या जाती कोणकोणत्या प्रकारच्या आहे

ईस्ट-वेस्ट,
पंचगंगा,
प्रशांत ,
समोर फुरसुंगी,
गावरान कांदा,

इतर जाती महाराष्ट्रात सुद्धा चांगल्या प्रकारे घेतले जातात, तसेच नाशिकचा लाल कांदा हे सुद्धा एक चांगली प्रचलित जात आहे. कांद्याला अन्नद्रव्य कशा प्रकारे द्यावे याचे व्यवस्थापन
सेंद्रिय खत कसे द्यायचं तर ते 25 ते 30 टन शेणखत हेक्‍टरी असा द्यायला परवडतं जिवाणू खते आजच तेरी लिहून व स्फुरद विरघळणारे जिवाणू 25 ग्रॅम किलो
बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.

कांद्याला खत देण्याची योग्य वेळ व काळ (उन्हाळी कांदा लागवड तंत्रज्ञान)

लागवडीपूर्वी 15 दिवस अगोदर देण्याचे खत म्हणजे ते सेंद्रिय खत. रासायनिक खत जर द्यायचं असला तर 50 बाय 50 बाय 50 किलो नत्र स्फुरद पालाश दर हेक्‍टरी.  अर्धे नत्र संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उर्वरित 50 किलो नत्राची मात्रा असते.  समान दोन आठवड्यांमध्ये त्या दोन याचा विभाग करून म्हणजे अर्ध अर्ध करून 30 व 45 दिवसांनी द्यावे.

रब्बी हंगामाचा कांदा परत लागवडीपूर्वी पंधरा दिवसाच्या अगोदर गंधकाचे प्रमाण दर हेक्‍टरी 45 किलो अशा प्रमाणात घ्यावं त्यावेळेस कांदा हा भरघोस पद्धतीने येण्याची चांगले शक्यता दिसून येते व कांदा चांगला येेतो कांदा चाळीची लांबी ही केव्हाही नेहमी वाऱ्याच्या दिशेला येईल अशी काटकोनात छेदणारे म्हणजेच दक्षिणोत्तर असावी म्हणजे कांद्याला हवा चांगल्या प्रकारची लागेल हे आपणास लक्षात आल्यानंतर त्या चाळीची लांबी योग्य प्रकारे ठेवावी.

या कांद्याच्या (उन्हाळी कांदा लागवड तंत्रज्ञान) चाळी च्या खाली आणि वरच्या दिशेने तसेच दोन्ही बाजूंनी हवा चांगल्या प्रकारे खेळती राहील याची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे कारण ह्या हवेमुळे कांदा सडण्याची क्षमता अतिशय कमी प्रमाणात राहते.

ज्यावेळेस आपण कांद्याची चाळ उभारणी करतो या चाळीच्या उभारणीच्या वेळेत ही गोष्ट लक्षात ठेवावी की कांदा चाळीच्या कोणत्याही दिशेला वारा अडवणारे कोणतेही बांधकाम अथवा कोणतेही जास्त जाडीचे प्रमाण असू नये उदाहरणार्थ झुडपे,झाडे,असतात अशा प्रकारे.

शक्यतोवर कांद्याच्या चाळी चे ठिकाण आहे ते अतिशय थंड अशा ठिकाणी हवे,  त्याच्या जवळपास झाडे असली तरी चालतील आणि त्या कांद्याच्या चाळी वर सावली असले तर फारच फायद्याचे,  कांद्याचा साठवण्याचा जो काळ असतो तो चांगल्या प्रमाणे वाढतो व कांदा जास्त प्रमाणात लागत नाही. कांदा बाजार कधी तेजीत राहतो तर कधी मंदीत असतो, म्हणून आपण पुढील पोस्ट मध्ये कांदा बाजार/ मार्केट, कांदा बाजार भाव, कांदा बी किंमत

भारतीय कांदा (उन्हाळी कांदा लागवड तंत्रज्ञान) म्हटला की तो टिकायला चांगला, चमकदार आणि टणक असल्यामुळे त्याला जागतिक बाजारांमध्ये चांगलीच मागणी आहे. भारत 76 देशांमध्ये कांदा निर्यात करतो, परंतु यावर्षी जगाला कांदा पुरविनारा भारत यंदा कांदा आयात करतो आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे पिंपळगाव बसमतच्या बाजारामध्ये तुर्कस्तानचा 100 टन कांदा आणि इजिप्तचा 10 टन कांदा आलेला आहे. कांदा दरवाढ नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी तुर्कस्तान आणि इजिप्तमधून कांदा आयात केला आहे असे सरकारचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारने एक लाख मेट्रिक टन कांदा आयात करण्याची योजना आखली आहे. कांद्याचे वाढलेले बाजार भाव हे स्थिर रहावे याकरिता हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

यावर्षी पावसाळा खूप झाला, मान्सून लांबला आणि त्यामुळे कांद्याचे फार मोठे नुकसान झाले जुन्या कांद्याची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे कांद्याचे भाव गगनाला भिडले शहरी भागामध्ये तर कांदा हा प्रतिकिलो 100 रु. किलो विकला जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, आम्ही ग्राहक हित लक्षात ठेवून कांदा आयतिचा निर्णय घेतलेला आहे.

जगामध्ये कांदा लागवडीमध्ये (उन्हाळी कांदा लागवड तंत्रज्ञान) भारत हाच 27 टक्क्यांवर आहेत आणि जगाच्या एकूण उत्पादनापैकी 20 टक्के उत्पादन हा एकटा भारत घेतो. त्यामुळे दरवर्षी 11 ते 12 लाख हेक्‍टर क्षेत्र कांदा लागवड भारतामध्ये होते. जवळपास 190 ते 195 लाख मेट्रिक टन उत्पादन भारत करतो.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टी झाली. पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे कांद्याचे नुकसान झाले. म्हणूनच महाराष्ट्र आणि देशामध्ये कांद्याचे उत्पादन घटलेले दिसते. ही संपूर्ण परिस्थिती पाहता केंद्र सरकारने कांदा आयातीचा निर्णय घेतला असे सरकारचे म्हणणे आहे.

त्यामुळे आता असेच म्हणावे लागेल की, ‘कांदा निर्यात करणाऱ्या भारतावर आली कांदा आयातीची वेळ’.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment