Bajar Bhav Soyabean Kapus Tur Today तूर हे खरीप हंगाम मधले शेवटचे पीक आहे त्यामुळे तुरीची आवक बाजारामध्ये सुरू झालेली आहे. मात्र हमीभावापेक्षा कमी दर बाजारामध्ये असल्याकारणाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले. त्यामुळे अखेर नाफेडच्या वतीने खरेदी केंद्राला सोमवारपासून सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता तूर या पिकाला योग्य म्हणजेच रास्त भाव मिळणार आहे. तुर पिकाला 6300 रुपये हमीभाव ठरवण्यात आला.
शेतकऱ्यांची तूर या पिकाची आवक सुरू होताच व्यापाऱ्यांकडून कमी दराने तूर या पिकाची खरेदी केली जात होती, शिवाय शेतकर्यांकडेही कोणताही पर्याय नसल्या कारणाने त्यांना व्यापाऱ्यांना तूर द्यावी लागत होती. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये घट झालेली आहे. आता शेतकऱ्यांना हमीभावाने तूर खरेदी करून एक प्रकारे दिलासा मिळणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आता थोर खरेदीची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या?
हमीभाव केंद्र सुरू झाल्यानंतर थेट तुम्हाला तुरीची विक्री करता येणार नाही. त्यासाठी अगोदर नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे. कारण नोंदीनुसार खरेदी होणार आहे. त्यामुळे पिकांची नोंदणी तर नाफेड मध्ये राहणारच आहे. परंतु कागदपत्रांची पूर्तता केल्यामुळे अनियमितता सुद्धा येणार नाही. अन्यथा शेतकऱ्यांच्या नावाखाली व्यापारी अधिकच्या दरामध्ये केंद्रावर मालाची विक्री करतील. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार कार्ड 8 अ, सातबारा, बँक खात्याचे पासबुक अशी कागदपत्रे जमा करून विक्री पूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांना केंद्रामुळे कोणता फायदा होईल?
शेतकऱ्यांची तूर काढणी पूर्वीच खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होती. मात्र ही खरेदी केंद्रे प्रक्रियेमध्ये अडकल्यामुळे आता अखेर सोमवारपासून ही केंद्रे सुरू झालेली आहेत, असे नॅशनल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक एस के सिंग यांनी सांगितले आहे.
तुरीचे बाजार भाव आणि नाफेड केंद्रावर चे भाव यामध्ये साधारणतः 400 रुपयांचा फरक आहे. नाफेडने तुरीचे दर 6300 रुपये ठरवलेले आहेत, तर बाजारामध्ये व्यापाऱ्यांकडून 5900 रुपयेनी तूर खरेदी केली जाते आहे. त्यामुळे प्रति क्विंटल मागे 300 ते 400 रुपये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आता या केंद्रांचा शेतकऱ्यांना मोठा आधार मिळालेला आहे.
तर मित्रांनो आमचा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हो आमच्या मराठी आरोग्य आणि बातमी मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या