Ayushman Bharat digital mission | आयुष्यमान भारत डिजिटल मिशन

Ayushman Bharat digital mission
देशातील गरिबांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा….. आयुष्मान भारत डिजिटल मिशन काय आहे माहिती जाणून घ्या.

गरीबीमुळे पैशाच्या अभावामुळे आपल्या आजारावर उपचार न करू शकणाऱ्या, विविध आरोग्य सेवांचा लाभ न घेऊ शकणाऱ्या, देशातील करोडो नागरिकांना दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर देशातील नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य सेवा प्रदान करण्यात यावा. त्यांना आरोग्य सेवांसाठी विमा कवच देता यावा, यासाठी आयुष्यमान भारत हे योजना संपूर्ण देशात सुरू करण्यात आली आहे.

आरोग्य सेतू अॅपचा वापर करणाऱ्यांना सरकारने मोठी सुविधा देऊ केली आहे. या युजरना त्यांची वैद्यकीय माहिती एकाच जागी ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी या लोकांना आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) देण्यात येणार आहे.

Read  Free Ration Scheme In Maharashtra 2023 | फ्री राशन योजना महाराष्ट्र २०२३.

आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंटशी जे कोणी रजिस्टर करतील त्यांना अॅपवरूनच 14 अंकी युनिक नंबर देण्यात येणार आहे. याद्वारे  आरोग्य सेतूचे युजर त्यांची नवी, जुनी वैद्यकीय माहिती आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंटला जोडू शकणार आहेत. केंद्र सरकारने नुकतेच नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनचे नाव बदलून आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) केले आहे.

सर्व नागरिकांना डिजिटल हेल्थ आयडी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. या डिजिटल आयडीमध्ये आरोग्यविषयक नोंदींची संपूर्ण माहिती दिली जाईल. सरकारने 15 ऑगस्ट 2020 रोजी राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान योजना सुरू केली होती. आतापर्यंत ही योजना प्रायोगिक तत्त्वावर चालवली जात होती. या योजनेअंतर्गत एका लाखाहून अधिक हेल्थ आयडी बनवण्यात आले आहेत.

Read  Pik Vima 2021 पीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात

या योजने अंतर्गत आता 2021- 22 पासून आयुष्यमान भारत डिजिटल मिशन सुरू करण्यात आले आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत, नागरिकांना मिळणारे हेल्थ आयडी कार्ड, ज्याद्वारे व्यक्तींना ओळखता येईल आणि त्याचे प्रमाणीकरण केले जाईल. तसेच त्यांचे आरोग्य अहवाल अनेक यंत्रणा आणि भागधारकांना वितरित केले जातील. हा आयडी तयार करण्यासाठी नागरिकांची महत्वाची माहिती गोळा केली जाईल. या अभियानांतर्गत सर्व नागरिकांच्या आरोग्यविषयक नोंदींचा डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. नागरिकांना हवे तेव्हा या माहितीचा वापर करता येईल.

ही योजना प्रायोगिक तत्त्वावर ते केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये ही योजना राबवत असताना आपण पाहिलं परंतु ज्याप्रमाणे आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत असते. त्याप्रमाणे आयुष्यमान भारत सर्विस सेंटर येथे बनवण्यात आले. या सेंटरमध्ये नागरिक सहजासहजी जाऊन आपल्या आरोग्याची तपासणी करतील. आपल्या दुर्दम्य आजारावर उपचार करतील असे या सर्व गोष्टी या ठिकाणी अगदी सहजरीत्या उपलब्ध आहे.

Read  पी एम किसान योजनेचा 8 वा हप्ता कधी मिळणार? PM Kisan Yojana

देशातील गरिबांना यापुढे गंभीर आजारांच्या उपचारांसाठी असहाय्य वाटणार नाही आणि सर्वस्व गहाण ठेवण्याची सक्ती केली जाणार नाही, आयुष्मान भारत अंतर्गत त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण मिळेल.  या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

Ayushman Bharat digital mission ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांशी शेअर करा.

हे नक्की वाचा – लोन मराठी  व बायोग्राफी

Leave a Comment