भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजना 2021 | Bhausaheb Fundkar Falbag Yojana Anudan

Bhausaheb Fundkar Falbag Yojana Anudan – बागायती शेती  शिवाय उत्पादनात वाढ होत नाही ही गोष्ट आता शेतकऱ्यांच्या आणि सरकारच्याही लक्षात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न (agricultural production ) वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न सरकार देखील करीत आहे.

भाऊसाहेब फुंडकर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 100% अनुदान मिळणार आहे.  याकरिता प्रक्रिया काय आहे व कोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

2018 पासून राज्यातील शेतऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र, योजनेची अंमलबजावणी होण्याच्या अनुशंगाने अनुदान हे तीन टप्प्यात दिले जाते. शिवाय दुसरा आणि तिसऱ्या टप्प्यातील अनुदान घेताना फळबागेची लागवड आणि बाग किती योग्य प्रमाणात वाढत आहे याची माहिती कृषी विभागाला देणे गरजेचे आहे.

Read  Bhausaheb Phundakar FalBag Lagvad 100% Anudan Yojana | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 100% अनुदान योजना

नवीन लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात अली आपले नाव चेक करा

अनुदानाचा लाभ कसा मिळतो?

या योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20% अशा तीन वर्षात देण्यात येणार असून लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी 90% तर कोरडवाहू झाडांसाठी 80% ठेवणे आवश्यक आहे.

हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे आवश्यक आहे. तरच राज्य सरकारकडून शेतकर्‍यांना अनुदान देण्यात येते. या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकरी कोंकण विभागात कमीत कमी 10 गुंठे तर जास्तीच जास्त 10 हेक्टर आणि इतर विभागात कमीत कमी 20 गुंठे तर जास्तीच जास्त 6 हेक्टर. क्षेत्र असणे आवश्यक आहे. फळपिक आणि लागवड केलेल्या झाडांच्या संख्येनुसार अनुदान हे दिले जाते.

Read  PM Kisan Yojana 10th Installment पी एम किसान योजनेचा 10वा हप्ता

अटीं व पूर्तता

फळबाग केलेल्या वर्षी किमान 80% बाग ही जीवंत असल्याचे दाखवावे लागणार आहे. शिवाय दुसऱ्या वर्षी 90 टक्के बाग जिवंत असल्यावरच एकूण अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांना मिळणार आहे. सातबारावर फळबाग लागवडीची नोंद करुन घेण्याची जबाबदारी ही लाभ घेण्यार्‍या शेतकर्‍यांची राहणार आहे. लाभार्थी शेतकर्‍यांना अनुदानाची रक्कम ही त्याच्या आधार जोडलेल्या बँक खात्यात सरकार कडून जमा करण्यात येईल. फळबाग जोपासण्यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचाच वापर करणे आवश्यक आहे. या ठीबकसाठीही 100 टक्के अनुदान देण्याची तरतूद यामध्ये आहे.

शेतकऱ्यांना थेट लाभ

लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येईल. संस्थात्मक शेतकर्‍यांना कोणताही लाभ मिळणार नाही. याशिवाय शेतकऱ्याचा स्वतःच्या नावाचा साताबराअसणे आवश्यक आहे. शेतीची खातेफोड न झाल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल. 7/12 वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक आहे.

Read  शेततळे मत्स्यपालन अनुदान योजना Shettale Matsyapalan Anudan Yojana

ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

सर्वात आधी राज्य सरकारच्या (mahadbtmahait.gov.in) अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. वेबसाइट वर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल, त्यावर तुम्हाला ऑनलाईन अॅपप्लिकेशन या लिंक वर क्लिक करावे.

नंतर तुम्हाला कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यावर क्लिक करावे लागेल, जसे की तुम्हाला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजना 2021 या लिंक वर क्लिक करायचे आहे. लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ऑनलाइन अर्ज उघडेल.

ऑनलाइन अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरावी लागेल. माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट करावे लागणार आहे.

पीक कर्ज यादी २०२३ 

Leave a Comment