group

शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 2000 रुपये pm kisan samman nidhi yojana

पी एम किसान सन्मान निधीचा pm kisan samman nidhi yojana आठवा हप्ता आज म्हणजेच 14 मे रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. याबाबत परिपत्रक सुद्धा निघालेले आहे, ज्यामध्ये सांगितले गेले आहे की देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत 14 मे 2019 रोजी सकाळी अकरा वाजता.

pm kisan samman nidhi yojana

याच वेळी देशातील 9.50 कोटी शेतकरी जे लाभार्थी आहेत, त्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये म्हणजेच एकूण 19 हजार कोटी रुपये जमा केले जाणार आहेत.

या हप्त्याचे वितरण होत असताना शेतकऱ्यांनी हे बघणे आवश्यक आहे की, आपल्या हप्त्याची स्थिती काय आहे? आपण डॉक्युमेंट दिली आहेत किंवा नाही? आपला एफ टी ओ जनरेट झाला आहे किंवा नाही? आज आपला हप्ता क्रेडीट होणार की नाही?. आपण ही सर्व माहिती ऑनलाइन चेक करू शकतो.

Read  PM Kisan Status 2022 11th Kist Beneficiary Status, Date in Marathi

शेतकरी मित्रांनो प्रत्येकाला प्रत्येक हप्ता मिळालेला आहे असे नाही. कोणाला पाचवा, कोणाला सहावा, कोणाला सातवा, तर कोणाला आठवा मिळेल. त्याकरता मित्रांनो आपल्याला pmkisan.gov.in या वेबसाईटवर जायचे आहे.

pm kisan samman nidhi yojana
त्यानंतर तुम्हाला या पोर्टल वर गेल्यानंतर लाभार्थी स्थिती पाहता येईल म्हणजेच आपल्याला लाभार्थी सद्यस्थिती (Beneficiary Status) या बटनावर क्लिक करायचे आहे.

त्यावर क्लिक केल्यानंतर आधार नंबर,
बँकेचा अकाउंट नंबर , आणि मोबाईल नंबर अशा प्रकारचे ऑप्शन तुम्हाला विचारले जातील, ही सर्व माहिती तुम्हाला टाकायची आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला आपली स्थिती दिसेल.

आधार नंबर टाकल्यानंतर गेट रिपोर्ट यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपली सर्व स्थिती म्हणजेच आपल्याला पैसा हप्ते किती मिळाले? आता आपली स्थिती काय आहे? हे समजेल आपल्या आलेल्या व येणाऱ्या हप्त्या पुढे आपले स्टेटस(Status) दिसेल. ज्यामध्ये तुम्ही एफ टी ओ जनरेटेड आणि पेमेंट कन्फर्मेशन इज पेंडिंग असे स्टेटस status दिसेल. म्हणजे आता एफ टी ओ जनरेट झालेला आहे. आता तुमच्या खात्यामध्ये कधी पण पैसे जमा होऊ शकतात.

Read  Free Silai Machine Yojana Form Online 2022 | फ्री सिलाई मशीन योजना फॉर्म Online 2022 .

pm kisan samman nidhi yojana

या पोर्टलच्या होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट (Beneficiary List) पाहता येईल. त्यामध्ये प्रथम आपल्याला राज्य सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपला जिल्हा त्यानंतर आपला तालुका आणि त्यानंतर गाव हे सर्व सिनेमे केल्यानंतर आपल्याला आपले नाव आहे किंवा नाही हे दिसेल म्हणजेच आपल्या गावचे सर्व लाभार्थी किती आपण त्यामध्ये निश्चितच बघू शकतो, परंतु इथे तुम्हाला सर्वच वेगवेगळे लाभार्थी दिसतील की, ज्यांना दोन हप्ते मिळालेले आहेत, कोणाला तिन मिळालेले आहेत, कोणाला सात मिळाले आहेत,ही सर्व गावाची यादी असल्यामुळे येथे तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळणार नाही.

pm kisan samman nidhi yojana

तर तुम्ही या वेबसाईटच्या होमपेजवर या, त्यानंतर डॅशबोर्ड सिलेक्ट करा इथे सुद्धा तुम्हाला राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव टाकायचे आहे. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला सर्व लाभार्थ्यांची स्थिती काय आहे, हे दिसेल. म्हणजे एखाद्या माणसाला किती हप्ते मिळाले? किती मिळायचे आहेत? ते सर्व दिसेल, कोणाचे आधार कार्ड चुकले असेल, कोणाचे बँक खाते नसेल ही सर्व स्थिती तुम्हाला तिथे दिसेल. ज्यांना आतापर्यंत पूर्ण हप्ते आलेले आहेत त्यांचीही यादी दिसेल.

Read  शेळी पालन (बकरी पालन) कर्ज योजना Shelipalan Karj Yojana 2021-22

म्हणजेच कोणाला किती किती हप्ते आले ती सर्व माहिती तुम्हाला दिसेल, ज्यांचे हप्ते रिजेक्ट झालेले आहेत, त्यांचे नावे सुद्धा तुम्हाला दिसतील.

वेबसाईटवर जाण्याकरता खाली क्लिक करा
http://pmkisan.gov.in

group

Leave a Comment

x