मित्रांनो POCRA पोकरा योजनेमध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी आली असून, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतो की शेतकऱ्यांनी पोखरा योजनेमध्ये अर्ज केले होते आणि अशा अर्जांना पूर्वसंमती मिळायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी नवीन पूर्वसंमती मिळालेल्या शेतकरी लाभार्थ्यांची यादी वेबसाईट वरती आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो या लेखांमध्ये आपण बघणार आहोत की लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादी आपण कशा बघणार आहोत? तेही आपल्या मोबाईलवर तेच आपल्या लेखामध्ये बघणार आहोत.
POCRA पोकरा
Table of Contents
www.mahapocra.gov.in या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. यानंतर आपल्याला प्रगती अहवाल या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. ज्यामध्ये आपण पहिलं ऑप्शन बघू शकता प्रकल्पांतर्गत लाभ मिळालेला लाभार्थ्यांची यादी लाभार्थी आहेत 124909 20 नोव्हेंबर 2020 अखेरपर्यंत ची यादी.
त्यावर आपण क्लिक केल्यानंतर सर्व जिल्ह्यांची यादी पाहू शकतो. यामध्ये आपल्याला 15 समाविष्ट जिल्ह्यांची नावे तिथे दिसतील. यामधील आपला जिल्हा आपल्याला निवडायचा आहे. जिल्ह्यावर क्लिक करून त्या लाभार्थ्यांच्या नावे 20 नोव्हेंबर 2020 अखेरपर्यंत अनुदान जमा झालेला आहे त्यांची यादी तुम्हाला इथे पाहायला मिळेल.
स्टेप्स
तुम्ही जिल्ह्यावर क्लिक केल्यानंतर त्या जिल्ह्याची PDF डाऊनलोड व्हायला सुरुवात होईल. डाउनलोड झाल्यानंतर आपण इथे तुम्हाला पाहायला मिळेल की 20 नोव्हेंबर 2020 अखेरपर्यंत ज्या लाभार्थ्यांच्या नावे रक्कम जमा झालेली आहे, अशा लाभार्थ्यांची नावे तुम्हाला दिसतील. ज्यामध्ये आपण जिल्हा, गावाचे नाव, तुमच्या गावाचा कोड आणि आपल्याला हे कशासाठी अनुदान मिळालेले आहे, अनुदानाची रक्कम आणि शेवटच्या कॉलममध्ये लाभार्थ्याचे नाव आपल्याला दिसेल.
यादी
पुढे आपण पाहू शकता,ज्यांनी 20 सप्टेंबर 2020 पर्यंत अर्ज केलेले आहे आणि ज्यांना पूर्वसंमती मिळालेली आहे. ज्यांना एसएमएस आलेले आहेत परंतु त्यांना ती माहिती न घेता आल्यामुळे बरेच लाभार्थी पूर्वसंमती च्या प्रतीक्षेत मध्ये आहेत, तर ठिकाणी ती यादी आपल्याला पाहायला मिळेल.
खालील लिंक वर क्लिक करून आपण डायरेक्ट POCRA या वेबसाईटवर जाऊ शकता.
www.mahapocra.gov.in