असं करताना त्याला लाज कशी नाही वाटली,६० वर्षीय वृद्धाकडून 5 वर्षीय अल्पवयीन विनयभ
संग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील एका गावात ६० वर्षीय वृद्धाने पाच वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून तामगाव पोलिस स्टेशनला गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी दुपारी अल्पवयीन मुलगी घराबाहेर खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने मुलीच्या घरी जाऊन तिच्या आईकडे तिच्याबाबत विचारपूस केली. ती बाहेर खेळायला गेल्याचे पीडितेच्या आईने आरोपीला सांगितल्याने तो तेथून निघून गेला. त्यानंतर आई मुलीला शोधण्यासाठी गेली. ती दिसून आली नाही. त्यामुळे मुलीच्या आईला संशय आल्याने तिने तत्काळ आरोपीच्या घराकडे धाव घेतली. मात्र, आरोपीच्या घराचे दोन्ही दरवाजे बंद दिसून आले. तेथून परत येताना घरातून मुलीचा आवाज आला. तेथे आरोपी हा घरात मुलीसोबत अश्लील चाळे करताना दिसून आल्याचे तक्रारीत नमुद आहे. मुलीला घटनेबाबत विचारणा करीत आईने पोलिसात धाव घेतली