मलकापूर :- अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मलकापूर मध्ये विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन जीवन जोती ब्लड बँक येथे करण्यात आले. तसेच भव्य शोभा यात्राही निघाली. यावेळी ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले. मलकापूर शहरात आज, दि. १९ जानेवारी रोजी दुर्गा नगर येथिल पुरातन श्रीराम मंदिर येथून भव्य शोभायात्रा करून समारोप भातृ मंडळ येथे झाले.
रामभक्तांचा विशाल जनसमुदाय या शोभायात्रेत उसळला. अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रा दुपारी ४.३० वाजता दुर्गा नगरातील नेमिवंत मंदिरातून निघाली. यामध्ये डीजे ढोल ताशे प्रमुख आकर्षण महाबली हनुमान, सडा – रांगोळी, पुष्पवर्षाव करण्यात आला. या शोभायात्रेचा बुलडाणा मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली व भातृमंडळ येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.