बापाने धारदार शस्त्राने मुलाचा कापला गळा ! अकोटातील घटना: मुलाचा मृत्यू

वृत्तसेवा

अकोट : बापाने धारदार शस्त्राने गळा कापल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची घटना अकोट शहरातील नवदुर्गा नगर येथे ११ जानेवारी रोजी रात्री घडली. शहर पोलिसांनी आरोपी बापाला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. रामटेक पुरा लगत नवदुर्गा नगर परिसरात ठाकरे कुटुंब राहते. गुरुवारी रात्री आरोपी बाळकृष्ण जानराव ठाकरे हा दारू पिऊन घरी आला आणि त्याने पत्नीस शिवीगाळ करून कापून टाकण्याची धमकी देऊ लागला. यावेळी त्याचा विवाहित मुलगा धनंजय याने आईला शिवीगाळ करून कापून

टाकण्याची धमकी का देता, असा जाब बापाला विचारला. या कारणांमुळे बापाने खिशातील धारदार लहान चाकू काढून मुलगा धनंजय ठाकरे याच्या गळ्यावर घाव करून खून केला. अशा आशयाची फिर्याद मृतकाची पत्नी पूजा धनंजय ठाकरे यांनी अकोट शहर पोलिस स्टेशनमध्ये दिली. या फिर्यादीवरून आरोपी बाळकृष्ण जानराव ठाकरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनास्थळी शहर पोलिस निरीक्षक तपन कोल्हे, पोलिस उपनिरीक्षक राजेश जवरे यांनी पोलिस पथकासह धाव घेतली. खून करून पसार झालेल्या आरोपीचा शोध घेऊन अटक केली व खून करण्यासाठी वापरलेले शस्त्र जप्त केले.

Leave a Comment