राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र मुलींच्या संघाला कास्यपदक; राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाची कास्यपदकाची हॅट्रिक

मलकापूर :- दि 26 ते 30 डिसेबर दरम्यान 17 वी राष्ट्रीय सबज्युनिअर स्पर्धा सॉफ्ट टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया व तामिळनाडू सॉफ्ट टेनिस असो याच्या संयुक्त विद्यमाने वेलीर येथे नुकतीच संपन्न झाली असून सदर स्पर्धेत संपूर्ण भारतातून जवळपास 45 संघांचा सहभाग असून महाराष्ट्र मुलींच्या संघाने कास्यपदक पटकाविले असून राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा नावलौकिक देशभर वाढविला. गत महिन्यात गोंदिया येथे झालेल्या सबज्युनीयर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेतून महाराष्ट्राचा बलाढ्य संघ निवडला गेला असून ह्या संघाने राष्ट्रीय स्पर्धेत प्रेक्षणीय केले.

महाराष्ट्र संघाने आंध्रप्रदेश दिल्ली या संघाचा पराभव करीत सेमीफायनल मध्ये प्रवेश केला असून उत्तरप्रदेश संघाबरोबर अत्यंत चुरशीच्या लढतीत थोड्या फरकाने निसटचा पराभव झाला असुन महाराष्ट्र महाराष्ट्र संघातर्फे प्रियंका हंगेरीकर सोनल खर्चे यांचा खेळ प्रेक्षणीय झाला असला तरी महाराष्ट्र संघाला कास्यपदकावर समाधान मानावे लागले. गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र संघाला कास्यपदकावर समाधान म्हणावे लागले यावर्षी अंतिम फेरी गाठण्याचे लक्ष असताना सुध्या महाराष्ट्र संघाचे स्वप्न साकार करता आले नाही याची खंत खेळाडूंना वाटली. गतवर्षी अहमदाबाद तसेच 2021 मध्ये जम्मू काश्मीर येथे झालेल्या स्पर्धेत कास्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
महाराष्ट्र संघात प्रियका हगेरीकर धाराशिव च्या नेतृत्वाखाली सोनल खर्चे बुलढाणा पलक परदेशी बुलढाणा ईरा ईराथान मुंबई विपसना सोनवणे सोलापूर भक्ती जाधव सोलापूर सृष्टी नरोटे वाशिम विधी वर्मा बुलढाणा याचा समावेश असून महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक रवींद्र सोनवणे मुंबई संघ व्यवस्थापक संतोषी कदम मुंबई यांचा समावेश होता.
महाराष्ट्र संघाने कास्यपदक
पटकाविल्याबदल महाराष्ट्र ऑलम्पिक असो चे सचिव नामदेव शिरगावकर एक्स सॉफ्ट टेनिस असो ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष सुनील पुर्णपात्रे सचिव रविद्र सोनावने उपाध्यक्ष दीपक आर्डे विजय पळसकर राजदीप मनवार शिवाजी वसपते आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहेत

Leave a Comment