पिवळ्या शिधापत्रिका BPL Ration Card वाटप करण्यास शासनाने परत एकदा सुरुवात केलेली आहे. याविषयी चा नवीन शासन निर्णय जीआर सुद्धा निर्गमित झालेला आहे तर कोणत्या लाभार्थ्यांना आता पिवळ्या शिधापत्रिका मिळणार आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत तर पहा मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आजचा दिनांक 23 जून 2021 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय जीआर आहे.
ज्या शासन निर्णयात अशी माहिती दिली आहे की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार अन्नधान्याचा लाभ मिळवण्यासाठी अनाथां कडून नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर खालील नमूद निकषानुसार नवीन शिधापत्रिका देण्यात यावी व शिधापत्रिकेवर अनुकूल असणारे लाभ सुद्धा त्यांना देण्यात यावे
1) वयाच्या 28 वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी म्हणजेच बीपीएल शिधापत्रिका BPL Ration Card वितरीत करून प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत लाभ देण्यात यावा आणि 28 वर्षावरील आहे त्यांना उत्पन्ना प्रमाणे अनुज्ञेय शिधापत्रिकेचा लाभ देण्यात यावा म्हणजेच मित्रांनो ज्यांच्या वयाची 28 वर्षे पूर्ण झालेली नाहीत, त्यांना अर्ज केल्याबरोबर बीपीएल शिधापत्रिका देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आलेले आहे तर, मित्रांनो सदरील प्रस्तावासोबत तुम्हाला ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, बँक पासबुक, बालगृह, निरीक्षणगृह, अनुरक्षण गृह इत्यादी संस्थेत वास्तव्य केल्या बाबतचे प्रमाणपत्र यापैकी कुठलेही एक डॉक्युमेंट्स जोडावे लागणार आहे आणि रहिवासी संदर्भात मित्रांनो नागरी भागासाठी नगरसेवक यांचे आणि ग्रामीण भागासाठी सरपंच किंवा उपसरपंच यांचे रहिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा सहा बहुतांशी अनाथांना वयाच्या 28 वर्षापर्यंत कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने अनाथां कडून वयाच्या 28 वर्षापर्यंत उत्पन्नाबाबत घोषणापत्र घेण्यात यावे अशा प्रकारचे निर्देश या जीआर नुसार देण्यात आलेली आहेत.
मित्रांनो संक्षिप्त स्वरुपात पाहायचे झाले तर जे अनात आहेत आणि ज्यांचे वय 28 वर्षापेक्षा कमी आहे अशा सर्व अनाथ मुलांना, नागरिकांना बीपीएल कार्ड BPL Ration Card चा लाभ मिळणार आहे. अशीच नवनवीन बातमी वाचण्याकरीता आमच्या बातमी मराठी Batmi Marathi या ब्लॉगला सुध्दा भेट द्या.