ग्राम रोजगार सेवक भरती – Gram Rojgar Sevak

Gram Rojgar Sevak-मित्रांनो ग्रामीण भागाच्या विकासामध्ये महत्त्वाची अशी भूमिका पार पाडणारा घटक तो म्हणजे ग्राम रोजगार सेवक होय. शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या ग्रामपंचायती पर्यंत शेतकऱ्यांपर्यंत गरजू व्यक्ती पर्यंत त्या योजनांबद्दल माहिती उपलब्ध करून देणे त्याचे अर्ज उपलब्ध करून देणे, अर्ज भरून घेणे आणि अशा शासन स्तरावरून असणाऱ्या योजनांचा लाभ गरजू व्यक्ती पर्यंत कसा पोहोचेल, नागरिकांपर्यंत कसा पोहोचेल. अशा प्रकारची विविध महत्त्वाची कामं ही ग्राम रोजगार सेवकांच्या माध्यमातून पार पाडली जात असतात.

रोजगार सेवकाच्या भरती Gram Rojgar Sevak

तर मित्रांनो ह्याच ग्राम रोजगार सेवकाच्या भरती च्या बाबतीत पात्रता, निवड, कामं, मानधन व बडतर्फी याबद्दल माहिती पाहूया.

मित्रांनो प्रत्येक ग्रामपंचायतीला फक्त एकाच ग्राम रोजगार सेवकाची Gram Rojgar Sevak निवड करता येऊ शकते. म्हणजेच प्रत्येक ग्रामपंचायतीला एक ग्राम रोजगार सेवक असतो. मात्र  ग्रामपंचायत जर मोठी असेल,  लोकसंख्या जास्त असेल किंवा आदिवासी भागांमध्ये ग्रामपंचायत जशी विखुरलेली असते अशा प्रकारे ग्रामपंचायत विखुरलेली असेल. फक्त अशा प्रकारच्या ग्रामपंचायतीमध्ये एक पेक्षा जास्त ग्राम रोजगार सेवकाची निवड करता येऊ शकते. हे निवडण्याचे अधिकार पूर्णत अहा त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला असतात.

भ्रष्टाचार एक समस्या मराठी निबंध Corruption Essay in Marathi

ग्रामरोजगार सेवकाचे Gram Rojgar Sevak पद हे अर्धवेळ कामाचे पद आहे. त्यामुळे ग्राम रोजगार सेवक या पदावर काम करणारा व्यक्ती शेती करत असेल छोटा-मोठा व्यवसाय करत असेल कुठलेही काम करत असेल, तर तो हे सर्व काम करत करत सुद्धा रोजगार सेवकाचे या पदाची काम करू शकत मात्र ग्राम रोजगार सेवकाचे जे कर्तव्य आहेत, काम आहेत ते त्यास वेळेवरच करावे लागतात.

ग्रामीण रोजगार सेवकांचे मानधन हे त्याने केलेल्या कामावर अवलंबून असते, जसे की गावांमध्ये रोजगार निर्माण करणे, शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे, गावातील नागरिकांना रोजगार मिळवून देणे, विकासाच्या कामांना चालना देणे.  यावर त्या गावातील ग्रामीण रोजगार सेवकाचे मानधन सरकार ठरवत असते.

ग्रामरोजगार सेवकाची निवड करण्याचे अधिकार हे त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला असतात. ग्रामरोजगार सेवकांच्या पदाकरता अर्ज करणारा व्यक्ती हा दहावी पास असणे गरजेचे आहे. यापेक्षा जास्त शिक्षित असणाऱ्या व्यक्तीला हा तिथे प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे काम, ग्रामसेवकाची काम या ग्राम रोजगार सेवक आज करावी लागतात. म्हणजे सेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला कॉम्प्युटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे. ज्या करताय एम एस – सी आय टी  MS-CIT किंवा त्या स्तरावरील कोर्सेस त्याने केलेले असले पाहिजेत. जर अशा प्रकारे MS CIT परीक्षा पास किंवा कम्प्युटर कोर्सेस केले नसले तर सहा महिन्याच्या कालावधीमध्ये हे कोर्सेस किंवा ही परीक्षा त्यास पास करावी लागते.

Read  Antyoday Yojana Free Ration वर्षभर मिळणार मोफत धान्य - मंत्रिमंडळाचा निर्णय

आज आपण बघतो की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत प्रोजेक्ट राबवले जात आहेत. मस्टर ऑनलाइन भरले जात आहे. त्यामुळे यामध्ये नवीन जर काही बदल झाले. आणि या संदर्भात शासनाने काही परीक्षा घेतल्या. तर वेळोवेळी त्या परीक्षासुद्धा ग्रामसेवकाला द्याव्या लागतील. ग्रामसेवक पदासाठी अर्ज करणारा व्यक्ती हा शरीराने सुदृढ असणे गरजेचे आहे. म्हणजे त्या व्यक्तीस ग्रामपंचायतीमार्फत गावांमध्ये केली जाणारी सर्व काम माहिती असणे गरजेचे आहे त्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे आणि गावातील याबाबतीत सर्व परिस्थिती त्यास हाताळणे गरजेचे आहे.

ग्राम रोजगार सेवकास कार्य किंवा काम करत असताना  शासनाकडून काही नियम घालून देण्यात आले आहेत. ते सर्व नियम ग्राम रोजगार सेवकास ध्यानात ठेवूनच गावांमध्ये काम करावं लागतं. याबाबत 2011 मध्ये  मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. यामध्ये काही बदल करून पुन्हा 2012 मध्ये एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यामध्ये ग्रामरोजगार सेवकाचे कार्य आणि कर्तव्य याबाबत सविस्तरपणे सांगितले गेले आहे. 2012 च्या शासन निर्णयानुसार-

कांदा अनुदान योजना फॉर्म 2023 .

ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य व जबाबदाऱ्या

1.  मनरेगाच्या संदर्भातील ग्रामपंचायत पातळीवर सर्व प्रकारचे अभिलेख तयार करणे ते जतन करणे व त्यावर स्वाक्षरी करणे.

2.  ग्राम रोजगार सेवक आणि एक ग्रामसेवकाचे मार्गदर्शनाखाली अभिलेखांचे सर्व प्रकारच्या नोंदी घ्याव्यात तसेच सर्व अभिलेख योग्यप्रकारे व्यवस्थितपणे व परिपूर्ण ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी ग्राम रोजगार सेवकांची राहील तथापि त्यावर नियंत्रण व प्रती स्वाक्षरी ग्रामसेवकाची राहील.

3.  भविष्यात मजुरांच्या हजेरीसाठी वापरावयाची यांत्रिक व इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे हाताळण्याची क्षमता व तयारी असावी.

4.  मजुरांचे हजेरीपत्रक तयार करणे ते भरणे व सांभाळणे

5.  रोजगार कार्यक्रम गावात सुरळीतपणे व सुनियोजितपणे राबविण्यासाठी व यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवकाच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी प्रयत्न करणे

6.  मोजमाप घेण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांना व तत्सम तांत्रिक अधिकाऱ्यांना मदत करणे व शासनाच्या आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना रोजगार कार्यक्रमासंदर्भात सहाय्य करणे.

7.  मस्टर रोल गट विकास अधिकारी कार्यालयात घेऊन जाणे आणि बँक व पोस्ट ऑफिस ची संपर्क साधून मजुरांच्या मजुरी प्रधानास विलंब होणार नाही याबाबत दक्ष राहणे.

8. मस्टरची प्राथमिक जबाबदारी रोजगार सेवकाची राहील.

9.  दैनंदिन कामाची नोंद असलेली डायरी ग्राम रोजगार सेवक आणि लिहिणे व ग्रामसेवकास सादर करणे अनिवार्य राहील

Read  कुक्कुटपालन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प Kukkutpalan Anudan

10.  ग्राम रोजगार सेवकाने ठराविक दिवशी किंवा वेळी ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहून कामाचे नियोजन करावे आणि त्याबाबतची माहिती ग्रामसेवकाला देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम पूर्ण करावे.

तसेच संदर्भातील शासन निर्णय दिनांक 2 मे 2011 मधील परिच्छेद क्रमांक 7 नुसार ग्राम रोजगार सेवकांना प्रधाने करण्याच्या संदर्भात दिलेल्या सूचना कायम ठेवून त्या अनुषंगाने खालील प्रमाणे अधिक सूचना देण्यात येत आहेत.

अ)ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून ग्राम रोजगार सेवकांना अदा करण्यात येणारे मानधन ग्रामसेवकाकडून त्यांच्या कामाचा अहवाल घेतल्यानंतर अदा करण्यात यावे.

ग्राम रोजगार सेवकांच्या बाबतीत गावातील नागरिकांची तक्रार असल्यास किंवा ग्राम रोजगार सेवकाने कामाच्या बाबतीत कुचराई केल्यास नीट काम न केल्यास, वेळेवर काम पूर्ण न करणे अशा स्वरूपाच्या विविध समस्या त्या ठिकाणी जर निर्माण झाल्या किंवा गावांमधून तक्रार निर्माण झाल्या तर,

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्राम रोजगार सेवकांच्या तक्रारीसंदर्भात अनुसरावयाची कार्यपद्धती दिल्या गेलेली आहे हा शासन निर्णय 22 जानेवारी 2014 रोजी घेण्यात आलेला आहे.

शासन निर्णयामध्ये सांगितल्याप्रमाणे-

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेले ग्राम रोजगार सेवक यांच्या कामासंदर्भात या योजनेचे लाभार्थी मजूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सरपंच व पदाधिकारी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचे पदाधिकारी अशासकीय संस्था सामान्य नागरिक व या योजनेशी संबंधित इतर घटक यांच्याकडून तक्रार अर्ज प्राप्त होतात अशी तक्रार प्राप्त झाल्यास अथवा त्यांना गैरवर्तणूक मळे पदावरून काढून टाकण्याची मागणी झाल्यास खालील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करावा.

1. ग्राम रोजगार सेवक यांच्या संदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित ग्रामसेवक यांनी सदर तक्रार विस्तार अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे त्वरित पाठवावी.

2.  या तक्रारीच्या अनुषंगाने विस्तार अधिकारी पंचायत समिती यांनी संबंधित ग्राम रोजगार सेवक यांच्याकडून पंधरा दिवसांच्या मुदतीत खुलासा मागावा.

3.  विस्तार अधिकारी पंचायत समिती यांनी सदर तक्रारीची चौकशी प्रक्रिया खुलासा प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या मुदतीमध्ये पूर्ण करावी.

4.  चौकशीच्या प्रक्रियेमध्ये विस्तार अधिकारी यांनी रोजगार हमी योजने विभागाच्या दिनांक 2 मे 2013 च्या शासन निर्णय मधील परीक्षेत क्रमांक 4 मध्ये नमूद केल्याप्रमाणे ग्राम रोजगार सेवक यांनी कर्तव्य पालन केले आहे किंवा नाही याची खात्री करावी तसेच विहित कार्यपद्धतीचा अवलंब केला नसल्यास त्यांना दंड आकारून सुधारण्याची संधी देण्याबद्दल सुचवावे.

परंतु एक गंभीर गैरवर्तन केले असल्यास या शासन निर्णय मधील परीक्षेत क्रमांक पाच मध्ये नमूद केल्यानुसार ग्राम रोजगार सेवक यांना द्यावयाच्या शिक्षेचे स्वरूप निश्चित करावे.

Read  Pik Nuksan Bharpai पीक नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मिळणार 365 कोटी रुपये

5.  विस्तार अधिकारी पंचायत समिती यांनी आपला चौकशी अहवाल निष्कर्ष व स्वयंस्पष्ट शिफारशीसह ग्रामपंचायतीकडे पाठवावा.

6.  विस्तार अधिकारी पंचायत समिती यांचा अहवाल नजीकच्या आठवड्यात किंवा महिन्यात होणाऱ्या ग्रामसभेसमोर विचारात ठेवण्यात यावा याकरिता या विषयाचा समावेश ग्रामसभेच्या बैठकीच्या विषय सूची मध्ये आगाऊ करण्यात यावा व ग्राम रोजगार सेवक आला ही त्याची सूचना देण्यात यावी.

7.  ग्रामसभेने विस्तार अधिकारी पंचायत समिती यांच्या अहवालावर सविस्तर चर्चा करून ग्राम रोजगार सेवक यांच्या बाबतीत निर्णय घ्यावा तसेच चौकशी अहवाल यामध्ये तथ्य आढळल्यास संबंधित ग्राम रोजगार सेवक यांना शिक्षा सुनावण्यात आला अथवा त्यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घ्यावा.

8.  ग्राम रोजगार सेवक यांना पदावरून दूर करण्यापूर्वी उपरोक्त क्रमांक 1ते 7 येथे नमूद केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा

9.   ग्राम रोजगार सेवकांच्या कर्तव्यात संदर्भात या विभागाच्या दिनांक 2 मे 2011 च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार व प्रस्तुत शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार विहित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब न करता ग्राम रोजगार सेवक यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेण्यात आल्यास अशा प्रकरणी संबंधित गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे फेरविचार अर्ज करता येईल. गटविकास अधिकारी हे  अशा प्रकरणाची गुणवत्ता तपासून संबंधित ग्रामपंचायतीकडे उचित कार्यवाही ची शिफारस करतील.

ग्राम रोजगार सेवक आज दिले जाणारे मानधन

तसे पाहिले तर ग्राम रोजगार सेवक आज अतिशय कमी मानधन दिल्या जात होते. यासंदर्भात शासनाने 2019 मध्ये एक शासन निर्णय काढला ग्राम रोजगार सेवक खास मनुष्यबळाच्या 6 टक्के मानधन दिले जात होते. याबरोबर एक प्रोत्साहन भत्ता सुद्धा त्यांना देण्यासाठी ठरवण्यात आले होते. म्हणजेच नेमके रोजगार सेवकांना किती मानधन मिळेल हे स्पष्ट नव्हतं. त्यामुळेच आता 8 मार्च 2021 रोजी ग्रामरोजगार सेवकांच्या मानधन बाबतीत सरकारने एक शासन निर्णय निर्गमित केला आहे.

शासन निर्णयानुसार

0 ते 750 मनुष्य दिवस प्रचलित पद्धतीनुसार सहा टक्के म्हणजेच एकूण कामाच्या.

751 ते 1500 मनुष्य दिवस वार्षिक मानधन 24000  2000 रुपये मासिक मानधन.

1501 ते 2500 मनुष्य दिवस वार्षिक मानधन 36 हजार रुपये तीन हजार रुपये मासिक मानधन

2501 ते 4000 बस मनुष्य दिवस 42 हजार वार्षिक मानधन 3500 मासिक मानधन

टीप – दहा हजार मनुष्य दिनाच्या पुढे प्रत्येक एक हजार मनुष्य दिवसापर्यंत 700 रुपयांची वाढ करून गणना करण्यात यावी.

अशाप्रकारे मित्रांनो ग्राम रोजगार सेवक Gram Rojgar Sevak कसा निवडला जातो, त्याची पात्रता काय, त्याने कोणकोणती कामं करावी आणि त्यास निलंबित करण्याची कोणती कारवाई आहे, तसेच त्यास मानधन किती मिळते? ह्या बाबतीत आपण माहिती बघितली.

माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 .

 

तुम्हाला आमचा Marathi School हा ब्लॉग नक्की आवडेल तेथे सुद्धा भेट द्या.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment