PM Kisan Yojana e-kyc | पी एम किसान योजना ई-केवायसी

PM Kisan Yojana e-kyc पीएम किसान योजनेची ई-केवायसी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीचे कारण….! जाणून घ्या त्या विषयी माहिती.

मित्रांनो, आम्ही नवनवीन योजनांची माहिती घेऊन येत असतो. त्याच अनुषंगाने आज आम्ही पी. एम. किसान योजनेच्या अकराव्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना ही e-kyc प्रमाणपत्र बंधनकारक आहे. या विषयाची माहिती घेऊन आलेलो आहोत. तर ही माहिती पूर्णपणे जाणून घेण्यासाठी खालील लेख पूर्ण वाचा.

पी. एम. किसान योजनेच्या अकराव्या हप्त्यासाठी व बोगस शेतकरी शोधण्यासाठी शेतकऱ्यांकरिता ई-केवायसी बंधनकारक आहे. त्यामुळे हा विषय शेतकऱ्यांच्या डोकेदुखीच कारण बनत चाललेला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन निवास उपजिल्हाधिकारी तथा योजनेच्या जिल्हास्तरीय नोडल अधिकारी शमा पवार यांनी केले आहे. ई-केवायसी ओटीपी किंवा बायोमॅट्रीक प्रणालीद्वारे करण्यासाठी पोर्टलवर पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

Read  Gram Panchayat Karmachari Bharti Prakriyet Badal | ग्रामपंचायत कर्मचारी भरती प्रक्रियेतील बदल

त्यामध्ये संबंधित लाभार्थी शेतकरी यांनी पी. एम. किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये किंवा पी.एम किसान ॲपद्वारे ओटीपीद्वारे लाभार्थ्यांना स्वत: ई-केवायसी प्रमाणिकरण मोफत करता येईल. तसेच ग्राहक सेवा केंद्रावर ई-केवायसी प्रमाणिकरण बायोमेट्रीक पध्दतीने करता यईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रावर बायोमॅट्रीक पध्दतीने ई-केवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी प्रति लाभार्थी प्रति बायोमॅट्रीक प्रमाणिकरण दर 15 रूपये निश्‍चित करण्यात आला आहे.

पी. एम. किसान योजने अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना एप्रिल- जुलै 2022 या कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणे आवश्‍यक आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे 10 हप्ते सुरळीत मिळाले. परंतु आता शासनाने केवायसी अनिवार्य केल्यामुळे अकरावा हप्ता येण्यास अडचण येणार आहे. परंतु केवायसी करण्यासाठी सेतू केंद्रावर बोटांचे ठसे उमटत नाहीत. त्यामुळे पुन्हा आधार कार्ड अपडेट करायला सांगण्यात येत आहे. ई-केवायसी ग्रामीण भागातील अशिक्षित शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे.

Read  PM Kisan Yojna 10th Installment | पी एम किसान योजनेचा 10 वा हप्ता आला नसेल तर काय करावे?

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतर शेतकरी बांधवांनाही शेअर करा.

Leave a Comment