Gram Panchayat Karmachari Bharti Prakriyet Badal | ग्रामपंचायत कर्मचारी भरती प्रक्रियेतील बदल

Gram Panchayat karmachari Bharti Prakriyet Badal ग्रामपंचायत कर्मचारी भरती प्रक्रियेतील बदल ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या भरतीचा संदर्भातील या भरती प्रक्रियेत बदल करण्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असे परिपत्रक काढण्यात आले. याबद्दलची माहिती या पोस्टच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला मग पाहूया ही माहिती काय आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम (61)1 अनन्वय पंचायतीला आपली कर्तव्य योग्य रीतीने पार पाडण्यासाठी आवश्यक असतील अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करता येईल व त्यांचे वेतन ग्रामनिधीतून देता येईल. तसेच (61) 1 अनन्वय पंचायतीची लोकसंख्या उत्पन्न व उपयोगक्षम साधन संपत्ती आणि विहित करण्यात येतील असे अन्य घटक विचारात घेता, राज्यशासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे असे निर्देश देईल की, पंचायतीस किंवा पंचायतीच्या गटास पंचायतीचा योजनाबद्ध विकास करण्यासाठी पंचायत विकास योजना, जमीन विकास योजना, पर्यावरण विकास योजना तसेच विकास केंद्र म्हणून अशा पंचायतीच्या किंवा पंचायतीच्या गटाच्या विकासाकरता उपजिवीका व रोजगार विकास योजना भौतिक व सामाजिक पायाभूत सुविधा विकास योजना आणि इतर संबंधित कार्यक्रमाकडे तयार करणे, राबविणे त्यांची अंमलबजावणी करणे, व्यवस्था पाहणे, देखभाल करणे व इतर देखरेख ठेवणे यासाठी कटांत्रि तत्त्वावर किंवा सल्लागार तत्त्वावर तज्ञ तांत्रिक सहाय्यक अभिकरणे आणि कुशल मनुष्यबळ नेमता येईल.

Read  Aapale Sarkar Seva Kendra Arj | आपले सरकार सेवा केंद्र अर्ज सुरू

2 पोट कलमे अनन्वय नेमलेले तज्ञ व तांत्रिक सहाय्य अभिकरणे आणि कुशल मनुष्यबळ हे राज्य शासनाने याबाबतीत प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने तयार केलेल्या नामिका (पॅनेल)मधून असेल आणि अशाप्रकारे नेमलेल्या व्यक्ती विहित करण्यात येतील अशी आहर्ता व अनुभव धारण करतील आणि त्यांना विहित करण्यात येतील अशा अटी व शर्तीवर नेमण्यात येईल अशी तरतूद आहे; परंतु बऱ्याच ग्रामपंचायती सदर तरतुदींचे पालन न करता मोठ्या प्रमाणात कटातील पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली त्या अनुषंगाने नुसार ग्रामपंचायतीमध्ये कंटात्रि पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासंबंधी निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परिपत्रक :
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1949 मधील कलम 61 व 61 (1) (2) मधील तरतुदीनुसार निर्देश देण्यात येते की, ग्रामपंचायतींमध्ये कंटात्री तत्त्वावर किंवा सल्लागार तत्त्वावर तज्ञ तांत्रिक सहाय्यक अभिकरणे आणि कुशल मनुष्यबळाची नेमणूक करताना संबंधित जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेऊनच नेमणूक करण्यात यावी. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अशाप्रकारे ग्रामपंचायतीमध्ये करावयाच्या मनुष्यबळाच्या नेमणुकीसाठी अहर्ता आणि अनुभव धारण करण्याची नामीका जिल्हास्तरावर तयार करावी व त्या नामिका नुसारच मुख्यकार्यकारी अधिकारी यांना विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार संबंधित ग्रामपंचायतींमध्ये कठाणी तत्त्वावर किंवा सल्लागार तत्त्वावर तज्ञ तांत्रिक सहाय्य अभिकरणे आणि कुशल मनुष्यबळाची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पूर्वपरवानगीने करावी. सदर सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणण्यात याव्यात.

Read  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट Nuksan Bharpai

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक 202202081247465920 असा आहे. हा आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

अशाप्रकारे ग्रामपंचायत प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. तरी Gram Panchayat Karmachari Bharti Prakriyet Badal ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आम्हाला कमेंट करुन सांगा.

Leave a Comment