राष्ट्रीय दिव्यांगशक्ती महासंघ च्या जिल्हाध्यक्षपदी अनिल गोठी

मलकापूर दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या कल्याणासाठी निर्माण करण्यात आलेल्या राष्ट्रीय दिव्यांग शक्ती महासंघाच्या 2024 नियुक्तींचा कार्यक्रम सुरू झालेला असून त्याचाच भाग म्हणून मलकापूर येथील पत्रकार अनिल गोठी यांची हॉटेल सारथी येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात राष्ट्रीय दिव्यांग शक्ती महासंघ च्या बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.

संपूर्ण देशामध्ये दिव्यांग बांधवांना भेडसावत असलेल्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असलेल्या राष्ट्रीय दिवंगशक्ती महासंघ मध्ये दिव्यांग बांधवांचा विविध योजना तसेच आर्थिक सबलीकरण करण्याच्या दृष्टीने व रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकारच्या कार्यक्रम राबवण्यात येणार असून सदर संघटनेची बुलढाणा जिल्हा कार्यकारणी तयार करण्याच्या उद्देशाने अनिल गोटे यांना जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. प्रकाश थाटे यांनी सांगितले.
अनिल गोटे यांच्या नियुक्तीने दिव्यांग बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून दिव्यांगांच्या हितासाठी तन-मन-धन लावून काम करू असे आश्वासन यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अनिल गोठी यांनी दिले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून हिंदी मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनश्रीताई काटीकर, गोविंद वानखेडे, सय्यद ताहेर, धर्मेश राजपूत, प्रदीप इंगळे, अनिल झनके, मयूर लड्डा व मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Leave a Comment