कोरोनाला रोखण्यासाठी सरकार लसीकरणावर भर दिला जात आहे. येत्या 1 मे पासून १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींनाही लस दिली जाणार आहे. मात्र, कोरोना लस घेण्यासाठी या वयोगटातील व्यक्तींनी Cowin वेब पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. येत्या 1 मे पासून १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींनाही लस दिली जाणार आहे. मात्र, कोरोना लस घेण्यासाठी या वयोगटातील व्यक्तींनी कोविन वेब पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. ४५ वर्षांपुढील व्यक्ती मात्र लसीकरणाच्या ठिकाणी थेट जाऊन लस घेऊ शकणार आहेत.
लसीकरण सर्वांसाठी खुले झाल्यानंतर लशीच्या मागणीत वाढ होणे अपेक्षित आहे.
त्यामुळे, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींना cowin पोर्टलवर नोंदणी करून अपाँईंटमेंट घ्यावी लागेल. गोंधळ न उडण्यासाठी सुरुवातीला या व्यक्तींना कोविनवर नोंदणी न करता थेट लसीकरणाच्या ठिकाणी जावून लस घेता येणार नाही, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
येणाऱ्या २८ तारखेपासून १८ वर्षांवरील सर्वांना ‘cowin’ किंवा ‘aarogyasetu’ ॲपवर नोंदणी करता येईल. लस घेण्याची प्रक्रिया आणि कागदपत्रांच्या पूर्ततेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या खासगी लसीकरण केंद्रे सरकारकडून लस घेऊन प्रत्येक व्यक्तीला प्रतिडोस २५० रुपये घेऊन ती देतात. येत्या एक मे पासून त्यांना सरकारऐवजी थेट उत्पादकांकडून लस घेता येईल. सरकारी केंद्रांवर ४५ वर्षांपुढील व्यक्ती व फ्रंटलाईन वर्करचे विनामूल्स लसीकरण सुरूच राहील.
औषध दुकानात लस नाही
खुल्या बाजारात 1 मे पूर्वी राज्य सरकारांना देण्याच्या ५० टक्के लशीची किमत उत्पादक कंपनींकडून जाहीर होईल. त्याआधारे सरकारी, खासगी, रुग्णालये, औद्योगिक आस्थापनांना कंपनीकडून लस खरेदी करता येईल. मात्र, लसीकरण धोरण उदार केले असले तरी औषध दुकानांमधून लस विकता येणार नाही वा फार्मासिस्टलाही ती खरेदी करता येणार नाही, असे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.