group

Cotton Prices in Maharashtra | एक क्विंटल कापसामध्ये 3 ग्रॅम सोनं घेईल

Cotton Prices in Maharashtra मित्रांनो गेल्या काही दशकांपासून कापसाच्या भावा ला गळती लागली होती आता ती थांबली अन प्रतिक्विंटल आता दहा हजाराहून अधिक भाव अकोल्यात कापसाला मिळत आहेत अशा परिस्थितीत मात्र एक क्विंटल कापसात तीन ग्रॅम पर्यंत सोनं मिळेल, अशी भाववाढीची अपेक्षा शेतकरी आता बाळगून आहेत. अजूनही कापूस साठवणुकीवर शेतकरी भर देत असल्याचे चित्र अकोला सह वऱ्हाडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे.

1972 मध्ये म्हणजेच महाराष्ट्रात पाच दशकांपूर्वी एका तोळ्याला म्हणजेच दहा ग्रॅमला सोन्याचा भाव 250 ते 300 रुपये होता व कापसाचा भाव 250 रुपये प्रति क्विंटल होता म्हणजेच एक क्विंटल कापूस विकून दहा ग्रॅम सोनं त्यावेळी विकत घेता येत होतं, त्यामुळेच कापसाला पांढरं सोनं सुद्धा म्हटल्या जात होत,  मात्र त्यानंतर दिवसेंदिवस सोन्याला जास्त भाव मिळाले, सोन्याला झळाळी येऊ लागली परंतु उत्पादन खर्च वाढवून कापसाचे भाव कमी झाले.

Read  धान उत्पादक शेतकऱ्यांना 700 रु बोनस-महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

दोन वर्षांपूर्वी तर शेतकऱ्याच्या कापसाला प्रति क्विंटल तीन ते चार हजार रुपये भाव कसा मिळेल म्हणून संघर्ष करावा लागला परंतु गेल्या चार-पाच वर्षांमध्ये देशांतर्गत तसेच देशाबाहेरील घटलेले कापसाचे उत्पादन आणि वाढलेल्या कापड उद्योगांमुळे कापसाच्या मागणी मध्ये पर्यायाने आता भावात तेजी आली दिसते.

केंद्र सरकारने सुधाम 2021 – 22 करता कापसाला 5726 व 6025 रुपये किमान आधारभूत किंमत जाहीर केलेली आहे. आणि सध्या ब्राझील चीन बांगलादेश अमेरिका इत्यादी देशांमध्ये कापूस उत्पादक घटल्याने कापसाची मागणी वाढत आहे देशांतर्गत सुद्धा गुजरात, पश्चिम बंगाल आणि इतर ठिकाणी कापड उद्योगासाठी प्रसिद्ध राज्यांमधून कापूस मागणी वाढली आहे त्यामुळे या वर्षी कापसाला बाजारामध्ये प्रति क्विंटल दहा हजाराहून अधिक भाव सध्या मिळत आहे, परंतु अशा परिस्थितीत अजूनही भावात शक्य आहे पुढील काही दिवसांमध्ये कापसाचा भाव 15 हजार ते 16 हजार रुपयांपर्यंत जाईल अशी शेतकऱ्यांकडून अपेक्षा केली जात आहे.

Read  खताचे नवीन दर जाहीर Fertilizer Prices in Maharashtra 2021

त्यामुळे शेतकरी आता आपला कापूस साठवून ठेवत असून, बाजारामध्ये कापसाची आवक कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.  सध्या कापसाला प्रति क्विंटल 9800 ते  10250 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे, मात्र तरीसुद्धा शेतकरी कापूस विक्रीकरता आणायला तयार नाहीत. शेतकऱ्यासोबत याबाबतीत चर्चा केली असता, अनेक शेतकऱ्यांनी 15 ते 16 हजार रुपयांपर्यंत भाव वाढीची अपेक्षा बाळगल्याचे लक्षात आलेले आहे.  मात्र उत्पादन व मागणीचे स्वरूप लक्षात घेता  11 हजार ते 12 हजार रुपयांपर्यंत भाव जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अशाप्रकारे आर.एम डहाके, निवृत्त विभागीय व्यवस्थापक, कापूस पणन महासंघ, अकोला यांनी म्हटले आहे.

सध्या पाहता कापसाला प्रतिक्विंटल दहा हजार पाचशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे परंतु अशा परिस्थितीत अजूनही  वाढीची शक्‍यता पाहता 100 क्विंटल कापूस विकायचा बाकी ठेवला आहे, आम्ही काही प्रमाणात भाव वाढल्यास ठेवलेला कापूस विकू कशाप्रकारे शेतकऱ्यांकडून म्हटल्या जात आहे. एकंदरीत कापूस उत्पादन आणि मागणी लक्षात घेता, अजून दीड ते दोन हजार रुपयांची भाव वाढ अपेक्षित आहे अशा प्रकारे चेतन गावंडे, कापूस उत्पादक शेतकरी,  सांगोवामेळ यांनी म्हटले आहे

Read  Hami Bhav खरिप हंगाम 2021 चे हमीभाव जाहीर

नक्की वाचा:- लोन मराठी आणि आई मराठी

group

Leave a Comment

x