Cow Bufello Subsidy Maharashtra गाई, म्हशी अनुदान योजनेत झाला नवा बद्दल…
जाणून घ्या काय आहे हा नवीन बदल?
मित्रांनो मराठवाडा धर्तीवर राबवल्या जाणाऱ्या गाई, म्हशी वाटप अनुदान योजनेच्या संदर्भात हे एक महत्वपूर्ण शासन निर्णय 25 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दलची माहिती आजच्या पोस्टच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे ही माहिती पूर्ण वाचा.
नवीन शासन निर्णय
आपण पाहतो 2017 मध्ये शासन निर्णय घेऊन राज्यांमध्ये मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यामध्ये उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया व सातारा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बीड व भंडारा या जिल्ह्यांमध्ये दोन देशी संकरित गाई आणि म्हशी च्या खताचे वाटप करणे ही योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली होती आणि योजना राबवत असताना घेण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये या योजनेच्या अंतर्गत गाई म्हशींची खरेदी आहे ही परराज्यातून करण्यात यावी अशा प्रकारची सूचना देण्यात आलेली होती. या सूचनेच्या अंतर्गत आपण जर पाहिले तर दोन देशी संकरित गाईसाठी प्रति 51 हजार रुपये, असे 1 लाख 2 हजार रुपये आणि दोन म्हशीच्या खरेदीसाठी प्रति 17 हजार रुपये असे एकूण 1 लाख 22 हजार रुपयांचा प्रकल्प खर्च करण्यात आलेला होता.
यामुळे आपण तर पाहिलं तर देशी गायीच्या खरेदीसाठी त्यांच्या खरेदीसाठी वाहतुकीचा खर्च हा प्रति 5 हजार रुपये असा एकूण गाई म्हशीसाठी असा 10 हजार रुपये ग्राह्य धरण्यात आले व त्यांनी एकूण 1 लाख 12 हजार रुपये गाईसाठी तर 1 लाख 32 हजार रुपये म्हशीसाठी यांच्या 50 टक्के अनुदान लाभार्थ्याना दिले जाणार होतं, त्याच्या अंतर्गत दोन देशी गाईसाठी 56 हजार रुपये तर दोन म्हशीसाठी 66 हजार रुपये एवढे अनुदान या ठिकाणी दिले जाणार होते. ज्याच्यामध्ये 10 हजार रुपये ठिकाणी वाहतुकीचा खर्च वाचणार होता.
मित्रांनो 25 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार याच्यामध्ये बदल करून या योजनेअंतर्गत खरेदी करावयाच्या देशी संकरित गाई व म्हशी राज्यातून किंवा परराज्यातून खरेदी करण्यात यावे अशा प्रकारचे बदल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये म्हशी जर राज्यातून खरेदी केल्या असेल तर अशा प्रकारे परराज्यातूनही असलेला वाहतुकीचा खर्च अनुज्ञेय राहणार नाही. अशा प्रकारची सूचना देखील देण्यात आली.
ज्याच्यामुळे या योजनेअंतर्गत राज्यातून जर गट खरेदी केला तर 10 हजार रुपये वाहतुकीचा खर्च आहे. हा वाहतुकीचा खर्च अनुदान म्हणून लाभार्थ्यांना दिला जाणार नाही. राज्यातून गाई खरेदी केल्या तर अनुदानासाठी 46 हजार रुपये आणि म्हशी खरेदी केल्या तर 56 हजार रुपये असे अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण mharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता. तर असा हा शासन निर्णय आम मध्ये झालेला बदल तुम्हाला कळलंच असेल.
Cow Bufello Subsidy Maharashtra तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
Gai
Siddhatek tal . karjat dist. Anager