बुलढाणा : शहरातील मलकापूर मार्गावरील बुलढाणा अर्बन रेसिडेन्सीमध्ये लग्नानिमित्त हळदीच्या कार्यक्रमात एका महिलेने पाळत ठेवून पर्स लंपास केल्याची घटना ३ फेब्रुवारीच्या रात्री १० ते १०:३० वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. या पर्समध्ये जवळपास १३ तोळ्यांचे दागिने व २ मोबाइल असा एकूण ६ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल होता.
जया विवेक खरात ५२ वर्ष रा.आरास ले-आउट बुलढाणा यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांच्या मुलीच्या लग्नाचा कार्यक्रम बुलढाणा अर्बन रेसिडेंसीमध्ये १४ फेब्रुवारीला ठरलेले होते. ३ फेब्रुवारी रोजी लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम होता. साखरपुड्याचा कार्यक्रम १२:३० वाजता सुरू झाला. त्यामध्ये नवरदेवाकडील मंडळींनी ठरल्याप्रमाणे नवऱ्या मुलीस एकूण १३ तोळ्यांचे सोन्याचे दागिने दिले होते.