मोताळा : लग्नसंबंध मोडल्याच्या संशयारुण मारहाण केल्याची घटना २५ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वरूड शिवारात घडली आहे, प्रकरणी फिर्यादीवरून दोघांविरुद्ध बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील आडविहीर येथील गजानन सपकाळ यांनी बोराखेडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार २५ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या वरूड शिवारातील शेतात असता गावातील दिनकर सपकाळ, प्रवीण सपकाळ हे बाप-लेक त्याठिकाणी आले. त्यांनी फिर्यादीस तुम्ही लग्नसंबंध का मोडले, असे म्हणत शिवीगाळ केली. यावेळी तुमचा गैरसमज झाला असे फिर्यादीने म्हटले असता दोघांनी फिर्यादीस लोटपाट केली. शेतात उपस्थित विमल सपकाळ, उषाबाई इंगळे यांनी मध्यस्थी केली असता फिर्यादीच्या पत्नीस मारहाण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.