शेतात लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबविली, पोस्टेत गुन्हा दाखल

मोताळा :- बोराखेडी पो.स्टे अंतर्गत अनेक चोरीचा अद्याप तपास लागलेला नसतांना पून्हा एकदा चोरट्यांनी आपले नेटवर्क सक्रीय करीत नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील ऋषीकेश सुनिल खर्चे यांची दुचाकी शेतातून लंपास केली.ऋषीकेश खर्चे यांनी बोराखेडी पोस्टेला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची टाकरखेड शिवारात असलेली काळ्या रंगाची मोटार सायकल चेसिस नंबर MBLHAW२३९ PJ१३२६० ही अंदाजे किंमत ४८ हजाराची दुचाकी चोरट्याने लंपास केली.अशा फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर भादंवीचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकाँ सुपडसिंग चव्हाण हे करीत आहे.

Read  गोडाऊन मधून सोयाबीन चोरून नेत असताना एकास रंगेहात पकडले, पोस्टेला गुन्हा दाखल

Leave a Comment