मलकापूर :- येथील टेलीफोन कॉलनी रोड येथे २ जानेवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास सुमित कैलास खांबे (रा.सावजी फैल)या युवकाला सहा युवकांनी शिल्लक कारणावरून शिवीगाळ करुन लोखंडीरॉडने मारहाण केली. या जबर मारहाणीत सुमित गंभीर जखमी झाला. या दरम्यान सुमितला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सविस्तर माहिती अशी कि, सुमित टेलिफोन कॉलनी येथे उभा असताना सहा युवकांनी शुल्लक कारणावरून शिवीगाळ करुन सुमितला जबर मारहाण केली. या दरम्यान अवि खैरे याने त्याच्या हातातील लोखंडी रॉड सुमितच्या डोक्यात मारला.निखील भोसले याने सुमितच्या डोक्यावर फायटरने मारले.तसेच शुभम कदम याने त्याच्या हातातील चाकू सुमितच्या पाठीत मारला, व वरत खैरे, राम कदम व ऋषीकेश तेजेकर यांनी सुमितच्या कानशिलात मारून बुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये वरद खैरे याने सुमितच्या पँटीच्या खिशातून १२७००/रुपये काढले तर राम कदम याने सुमितच्या गळयातील सोन्याची चैन लंपास केली. सुमित कैलास खांबे, रा. सावजीफैल, मलकापूर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी अवि खैरे, निखील संजय भोसले, राम कदम, वरत खैरे, ऋषीकेश तेजेकर, शुभम कदम रा. मलकापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.