Decision of Maharashtra Goverment about Shetsara | महाराष्ट्र सरकारचा शेतसाराबद्दल निर्णय

Decision of Maharashtra Goverment about Shetsara शेतसारा न भरल्यास शेतजमिनी सरकार दरबारी जमा…. सरकारचा मोठा निर्णय….!

सरकारने महसूल वाढीसाठी नवे धोरण अवलंबले आहे. त्यामध्ये जमिन शेतसाऱ्या विषयी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय म्हणजे शेतसारा न भरल्यास शेतजमीन सरकार दरबारी जमा होणार आहे. निफाड तालुक्यात याबाबतच्या कारवाईला सुरुवात झालेली आहे. थकबाकीदारांना नोटीस पाठवूनही दुर्लक्ष होत असल्याने कारवाईला गती देण्यात आली आहे.

आता सातबाऱ्यावर महाराष्ट्र शासन लिहिण्याचे आदेश देण्यात आले आहे. शेतसारा न भरल्यास शेतकऱ्यांची शेतजमीन सरकार दरबारी जमा होणार आहे. निफाड तालुक्यातील थकबाकीदारांना वेळोवेळी नोटीस पाठवूनही खातेदार दुर्लक्ष करत असल्याने, त्यांच्या सातबाऱ्यावर ‘महाराष्ट्र शासन’ असे नाव लावण्याची कारवाई सुरू आहे. निफाड तहसीलदार शरद घोरपडे यांनी तालुक्यातील तलाठी कार्यालयांना असे आदेश दिले.

Read  ग्राम रोजगार सेवक भरती - Gram Rojgar Sevak

ज्या शेतकऱ्यांच्या शेतसारा बाकी असेल त्या शेतकऱ्यांनी तात्काळ शेतसारा भरावा. असे आवाहन तलाठी कार्यालयाकडून करण्यात आले आहे मात्र अद्यापि जे शेतसारा भरणार नाहीत, अशा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर महाराष्ट्र शासनाचे नाव नोंदविण्यात येणार आहे. काही ठिकाणी ‘महाराष्ट्र शासन’ हे नाव सातबाऱ्यावर चढविण्यात आले आहे.

तुम्ही हे जरा भरला नसेल तर शेतसारा भरून घ्या व ही माहितीa इतरांना शेअर करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

बायोग्राफी करिता आमच्या biographyof.in या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

Leave a Comment