Drip Subsidy Maharashtra 2022 शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना याअंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसवण्या करिता अनुदान देण्यात येत असते. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सन 2017 च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खर्चाकरिता 55 टक्के व इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान मिळत असते यामध्ये केंद्राचा हिस्सा 60 टक्के व राज्याचा हिस्सा 40 टक्के असतो जास्तीत जास्त पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत जीवदान देण्यात येते.
ठिबक व तुषार सिंचन योजना 2022
आता शेतकऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना Mukhymantri Shaswat Sinchan Yojana याद्वारे ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% अनुदान व्यतिरिक्त 25% पूरक अनुदान व इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान व्यतिरिक्त 30 टक्के पूरक अनुदान हे जास्तीत जास्त पाच हेक्टरच्या क्षेत्राच्या मर्यादेत देण्यास शासनाने आता मान्यता दिली आहे.
2021-22 मध्ये केंद्र शासनाने खर्चामध्ये वाढ केली आहे त्यामुळे अनुदानाच्या रकमेत मध्ये सुद्धा वाढ झालेली आहे सन 2021-22 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आता 80 टक्के अनुदान तर इतर शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान मिळणार आहे.
1 हेक्टरपर्यंत कितीला मिळतो पुढील प्रमाणे
ठिबक सिंचन एक हेक्टर करता लॅटरल अंतर मीटर मध्ये
1.2 × 0.6 करिता
सन 2021-22 मधील खर्चाची मर्यादा 1 लाख 27 हजार 501 रुपये यातील 80% अनुदान 1 लाख 2 हजार 1 रुपये तर 75% अनुदान 95 हजार 626 रुपये आहे
ठिबक सिंचन एक हेक्टर करिता लॅटरल अंतर मीटर मध्ये
1.5 × 1.5 करीता
सन 2021-22 मधील खर्चमर्यादा 97 हजार 245 रुपये यातील 80% अनुदान 77 हजार 796 रुपये आणि 75% अनुदान 72 हजार 934 रुपये.
ठिबक सिंचन एक हेक्टर करिता लॅटरल अंतर मीटर मध्ये
5×5 करिता
सन 2021 22 मधील खर्चमर्यादा 39 हजार 378 रुपये यामधील ते अनुदान 80% मध्ये 31 हजार 502 रुपये 75% 29 हजार 533 रुपये.
तुषार सिंचन 1 हेक्टर करिता
2021-22 मध्ये 75mm करिता
24 हजार 194 रुपये यातील 80% एकूण वीस हजार 355 रुपये तर 75% 18 हजार 145 रुपये अनुदान देय राहील.
तुषार सिंचन 2 हेक्टर करिता
2021-22 मध्ये 75mm करिता
34 हजार 657 रुपये मधील 80% 27 हजार 725 तर 75% 25 हजार 992 रुपये अनुदान देय राहील.
मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रवण 14 जिल्हे व तीन नक्षलग्रस्त जिल्हे अशा एकूण 17 जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील तसेच उर्वरित महाराष्ट्रामधील अवर्षणप्रवण तालुके 244 यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना राबविण्यात येत होती. आणखी यामध्ये वाढ करून उर्वरित सर्व 107 तालुक्यांचा समावेश या योजनेत राज्य शासनाने केला आहे
Originally posted 2022-09-19 05:02:43.
I have applied for subsidy for purchase of sprinkler set on 06/09/2022. But no reply is received from the concerned authority. My applied ID is 222310008078683
Name: Manohar Tulshiramji Januskar
Arjun nagar Amravati-444603
Mobile No. 7875917791