Driving Licence Without Test Driving Licence New Rules ड्रायव्हिंग लायसन्स नविन नियम

Driving Licence Without Test Driving Licence New Rules – मित्रांनो आता ड्रायव्हिंग लायसन्सचे नविन नियम लागु करण्यात आले आहेत. तुम्हाला आता RTO office मध्ये जाण्याची गरज नाही, लांब रांगेत उभे राहण्याची पण गरज पडणार नाही. कारण केंद्र सरकारने नविन ड्रायव्हिंग लायसन्स नियम बनवले आहेत.

Driving Test (चाचणी) ची गरज नाही

तुम्हाला या अगोदर ड्रायव्हिंग लायसन्स हवे असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागत होते, आता जाण्याची गरज नाही कारण केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे नियम अधिसूचित केले आहेत. ड्रायव्हिंग लयसेन्सचे नविन नियम या महिन्यापासून लागु केले आहेत. यामुळे कोट्यावधी ड्रायव्हिंग लायसन्सची वाट पाहणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Driving School मध्ये जावून प्रशिक्षण घेणे आवश्यक

वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे ही, आता आरटीओमध्ये जाऊन वाहन परवाना घेण्यासाठी चाचणीची गरज नाही. मात्र, अर्जदारांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्यासाठी ते कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग प्रशिक्षण स्कूलमध्ये ड्रायव्हिंग परवान्यासाठी स्वत:ची नोंदणी करु शकतात. त्यांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तेथे चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. अर्जदारांना ड्रायव्हिंग स्कूलद्वारे प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्राच्या आधारे अर्जदाराचा ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात येईल.

Read  PM-SYM PM Shram Yogi Mandhan Yojana 2021

नवीन नियम काय आहेत

प्रशिक्षण केंद्रांबाबत रस्ते व परिवहन मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक तत्त्वे आणि अटी देखील आहेत. ज्यामध्ये प्रशिक्षण केंद्रांच्या क्षेत्रापासून ते प्रशिक्षकाच्या शिक्षणापर्यंतचा समावेश आहे. चला हे समजून घेऊया.

1. अधिकृत एजन्सीने हे सुनिश्चित केले पाहिजे की दुचाकी, तीन चाकी आणि हलकी मोटार वाहनांसाठी किमान एक एकर जमीन, मध्यम आणि अवजड प्रवासी वस्तू वाहने किंवा ट्रेलर्ससाठी प्रशिक्षण केंद्रासाठी दोन एकर जागा आवश्यक आहे.

2. प्रशिक्षक किमान 12 वी पास असावा आणि किमान पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा, रहदारीच्या नियमांमध्ये तो पारंगत असावा.

3. मंत्रालयाने अध्यापन अभ्यासक्रमही हे शिक्षण निर्धारित केले आहे. हलकी मोटार वाहने चालविण्यासाठी, कोर्सचा कालावधी जास्तीत जास्त 4 आठवडे 29 तासांपर्यंत असेल. या ड्रायव्हिंग सेंटरचा अभ्यासक्रम दोन भागात विभागला जाईल. थेरी आणि प्रॅक्टिकल.

Read  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट Nuksan Bharpai

4. लोकांना मूलभूत रस्ते, ग्रामीण रस्ते, महामार्ग, शहर रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग, चढ आणि उतारावर वाहन चालविणे इ. चालविण्यास शिकण्यात 21 तास घालवावे लागतात. थेरी भागात संपूर्ण कोर्सच्या 8 तासांचा समावेश असेल, त्यामध्ये रस्ते शिष्टाचार, रस्ता रेज, ट्रॅफिक शिक्षण, अपघातांची कारणे समजून घेणे, प्रथमोपचार आणि इंधन कार्यक्षमतेचा समावेश असेल

आशाप्रकारे मित्रांनो ड्रायव्हिंग चे वरीप्रमाणे नियमाचे पालन करून आपण driving licence मिळवू शकता. आपल्याकडे थोडा वेळ असेल तर आमच्या आई मराठी aai marathi आणि अद्भुत मराठी adbhut marathi या ब्लॉगला क्लीक करून भेट देऊ शकता

 

 

 

 

6 thoughts on “Driving Licence Without Test Driving Licence New Rules ड्रायव्हिंग लायसन्स नविन नियम

Leave a Reply

Your email address will not be published.

x