खतावर 148 टक्के सबसिडी – केंद्र शासनाचा निर्णय Fertilizer Subsidy

Fertilizer Subsidy – मित्रांनो शेतकऱ्यांना खते रास्त भावात मिळावी आणि याच प्रमाणे खताचे भाव नियंत्रणात राहावे, याकरता केंद्रशासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. काल म्हणजेच 19 मे 2021 रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये खतावरील सबसिडी वाढवण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे.

खतावर 148 टक्के सबसिडी – केंद्र शासनाचा निर्णय Fertilizer Subsidy

मित्रांनो यापूर्वी पाहिलं होतं की 15 मे  2021 रोजी खते व रसायन मंत्रालयाने खतावरील आपण सबसिडी वाढवणार आहोत. अशा प्रकारचे एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले होते. मित्रांनो याच अनुषंगाने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये डीएपी या खतावरील सबसिडी 140 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.

Read  Aapale Sarkar Seva Kendra Arj | आपले सरकार सेवा केंद्र अर्ज सुरू

मित्रांनो गेल्या वर्षी 1700 रुपये ची बॅगवर  केंद्र सरकारच्या माध्यमातून 500 रुपये सबसिडी दिल्या जात होती. म्हणजे शेतकऱ्याला ही बॅग 1200 रुपयाला मिळत होती. जागतिक पातळीवर बघता खताचे भाव वाढले होते. 2400 रुपये ला सध्या बॅग होती. पाचशे रुपये सबसिडी वगळता ही बॅग 1900 रुपयाला मिळत होती.

मित्रांनो या बॅग वर आता सबसिडी 148 टक्के मिळणार आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांना डीएपी ची बॅग 1200 रुपयाला मिळणार आहे. या पत्रामध्ये अशाप्रकारे सांगण्यात आलेला आहे की, केंद्र शासन शेतकऱ्यांना डीएपी बॅग किंवा इतर खते रास्त भावात मिळेल यासाठी सतत प्रयत्न करीन. ह्याकरता केंद्रशासन रासायनिक खतांच्या बाबतीत 80 हजार कोटी रुपये खर्च करते. डीएपी खता करता सरकार 14 हजार 775 कोटी रुपये खर्च करणार आहे.

Read  Talathi तलाठी दप्तर होणार ऑनलाईन 2021

तर अशाप्रकारे मित्रांनो केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी खतांच्या Fertilizer Subsidy बाबतीत अशाप्रकारे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे.

 

 

 

 

Leave a Comment