Gharkul Yojana Update जे पात्र लाभार्थी घरकुल योजनेच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत मध्ये आहेत त्यांच्यासाठी राज्य सरकारने 26 नोव्हेंबर 2021 रोजी जीआर काढला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून हा शासन निर्णय निघालेला आहे.
शासन निर्णय:
1. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती घटकाअंतर्गत केंद्र शासनाने वितरीत केलेला सन 2020- 21 या वर्षासाठी पहिला हप्ता म्हणून 3 कोटी 51 लाख 54 हजार एवढा निधी व समरूप राज्य हिस्सा रुपये 2 कोटी 34 लाख 36 हजार एवढा निधी खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली द्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
वरील निधी सन 2020 – 21 या वर्षासाठी पहिला हप्ता म्हणून अनुसूचित जातीतील घटकांकरिता वितरित करण्यात येणार आहे.