Govardhan govansh Seva Kendra Yojana 2022 | गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना 2022

Govardhan govansh Seva Kendra Yojana 2022 :
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजने करिता 25 लाखापर्यंत अनुदान…. अर्ज सुरू जाणून घ्या त्या विषयी माहिती.

गाई पालनाकरिता 25 लाख रुपयांचे अनुदान देणारी एक महत्वाची योजना म्हणजे गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना ही आहे. या योजनेकरिता महसूल मंडळाकडून 34 राज्यात करता अर्ज मागवले आहेत. आपण या पोस्टमध्ये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना 2022 विषयी माहिती पाहणार आहोत तसेच या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो? त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? याचा अर्ज कसा करायचा? लाभार्थी कोण आहेत तसेच दिला जाणारा लाभांश कसा असेल या विषयीची सर्व माहिती आपण या लेखामध्ये पाहूया.

मित्रांनो, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून एक प्रेस नोट काढून एक महत्त्वपूर्ण असे आवाहन करण्यात आले आहे. त्याच्यामध्ये गोवर्धन गोवंश करता एक प्रेस नोट काढून 7 मार्च 2022 मध्ये सोमवारपासून या योजनेचे अर्ज मागवण्यात आले, त्याच्यासाठी अंतिम मुदत 6 एप्रिल 2022 असणार आहे. आपण पाहिलं तर 26 मार्च 2019 रोजी शासन निर्णय काढून गोवर्धन गोवंश ही योजना राज्यामध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आली होती.

Read  Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana Loan Scheme 2022 | वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना

अधिक माहितीकरीता येथे क्लिक करा

Leave a Comment