Grampanchayat Job Card ग्रामपंचायत योजनांची माहिती

Grampanchayat Job Card मनरेगा nrega अंतर्गत विविध योजनांची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या अंतर्गत पंचायत समिती, ग्रामपंचायत अंतर्गत विविध प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या जसे की शेततळे, सिंचन विहीर, फळबाग लागवड, वृक्ष लागवड, असेल अशा प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती आपण बघणार आहोत.

प्रत्येकास असं वाटतं की, आपल्याला या योजनांचा लाभ मिळावा. परंतु शासन स्तरावर फार कमी लोकांना याचा लाभ मिळतो. प्रत्येक व्यक्तीला याचा लाभ मिळेल असे नाही. चलो कागदपत्रांची पूर्तता करतात जे लोक योजनेच्या नियमांमध्ये बसतात अशाच व्यक्तीला वैयक्तिक लाभ मिळतो. किंवा ग्रामपंचायत मध्ये किंवा पंचायत समिती मध्ये विचारणा केली तर अशा प्रकारच्या योजना आमच्याकडे नाहीच अशाप्रकारे म्हटले जाते. मग या योजना राबवल्या जातात का आणि याचे लाभ कोणाला मिळतात? असा प्रश्न आपल्याला पडला असेल.

आज आपण या लेखामध्ये ग्रामपंचायत आणि पंचायत समिती अंतर्गत कोणकोणत्या योजना राबवल्या जातात आणि त्याचा लाभ कोणा कोणाला मिळू शकतो. 2018- 19 व 2019 – 20 मध्ये कोणते लाभार्थी होते. जॉब कार्ड धारक कोण कोण व्यक्ती आहेत. कशाप्रकारे आपण अर्ज करायचा हे सविस्तर बघूया.

Read  Job for Age 60 Retired People | 60 ओलांडलेल्या निवृत्त लोकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

सर्वात प्रथम आपल्याला मनरेगाच्या वेबसाईटवर जावं लागेल. https://nrega.nic in ही वेबसाईट गुगलमध्ये आपल्याला सर्च करावी लागेल. वेबसाईटच्या होमपेजवर गेल्यानंतर आपल्याला ग्रामपंचायत Gram Panchayat ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे. त्यामध्ये दुसरा ऑप्शन आहे जनरेट रिपोर्टस् Generate Reports यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर यामध्ये विविध राज्यांची नावे आहेत त्या मधून महाराष्ट्र निवडायचा आहे, फायनान्शियल इयर निवडायचा आहे, डिस्टिक निवडायचा आहे, ब्लॉक निवडायचा आहे आणि त्यानंतर पंचायत समिती निवडायची आहे. सर्वात शेवटी आपल्याला प्रोसीड procced वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर गावाचा डॅशबोर्ड उघडेल.

R5.IPPE ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर दोन नंबर चा ऑप्शन भिशी आहे लिस्ट ऑफ वर्क list of work यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला बरेच ऑप्शन तिथे दिसतील. त्या कामांपैकी जे काम आपल्याला पाहायचं असेल त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल. जसे की ग्रामीण पाणीपुरवठा, फिशरीज आहे, इंदिरा आवास घरकुल योजना असेल सर्व ऑप्शन आपल्याला तिथे पाहायला मिळते. त्यापैकी एका वर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर त्या कामाची त्या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल.

Read  सौर कृषी पंप योजना, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, महाऊर्जा (Mahaurja) Saur Krushi Pamp Yojana

वैयक्तिक लाभाच्या योजना जाशिकी सुलभ शौचालय. ऑल सिलेक्ट केल्यानंतर त्या योजनेचे लाभार्थी, ती योजना चालू आहे का? बंद आहे, योजना कम्प्लीट झालेली आहे का?  समजा नवीन काम असतील तर ऑल सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जे वर्ष निवडायचे असेल ते निवडता येते. वर्ष निवडल्यानंतर कामाचे नाव कामाचे स्टेटस काय आहे, वर्ष, कामाची कॅटेगिरी काय आहे? हे सर्व बघता येईल. म्हणजेच त्या वर्षातील सर्व लाभार्थ्यांची यादी तुम्हाला पाहता येईल.

हे पाहत असताना आपण ज्या जॉब कार्ड वरती ज्या लोकांना काम दिले गेले आहे, त्याची माहिती सुद्धा बघू शकतो. त्याकरता आपल्याला R3 Work मधील Consolidate Report of Payment to Work ऑप्शन निवडायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्यांचे रिपोर्ट कार्ड बनलेले आहे. त्या लोकांची संपूर्ण माहिती मिळेल.

Read  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना POCRA Nanasaheb Deshmukh Krushi Snajeevani Yojana 2020

आपल्याला नवीन काम उपलब्ध आहे का हे सुद्धा आपण या वेबसाइटवर बघू शकता तर अशाप्रकारे मित्रांनो Grampanchayat Job Cardहा लेख आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका तसेच कमेंट करा हा लेख कसा वाटला. आणि हो आमच्या Marathi School आणि Batmi Marathi या ब्लॉग ला अवश्य भेट द्या.

2 thoughts on “Grampanchayat Job Card ग्रामपंचायत योजनांची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x